Tuesday , September 17 2024
Breaking News

खानापूर

खानापूरात आज जंगी कुस्त्यांचे मैदान

  खानापूर : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आखिल भारतीय पातळीवरील १५ व्या वर्षीच्या कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या आखाड्याची सध्या जोरदार …

Read More »

महात्मा फुले वाचनालयाचा वर्धापनदिन साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले वाचनालयाचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे खजिनदार सुरेश पाटील हे होते. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष हभप दशरथ पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ …

Read More »

मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : 1 जुन रोजी होणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गर्लगुंजी येथील येथील अरुण मष्णू पाटील (वय 63) हे 1 जून रोजी होणाऱ्या आपल्या …

Read More »

नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा नियती फाऊंडेशनच्यावतीने सत्कार

  खानापूर : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा आज खानापूर नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच खानापूर भाजपच्या महिला प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. या यशाबरोबरच जबाबदारी देखील मोठी …

Read More »

खानापूरात कृषी खात्याच्या सवलतीच्या दरातील बी बियाणाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते वाटप

  खानापूर : खानापूर तालुक्यात सध्या पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कृषी खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीच्या दरातील बी बियाणाच्या वाटपाच्या प्रतिक्षेत गेल्या कित्येक दिवसापासुन होते. यंदाच्या कृषी खात्याकडून सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणाऱ्या बी बियाणाचे वाटप नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर याच्याहस्ते गुरूवारी दि. २५ रोजी जांबोटी क्राॅसवरील तालुका कृषी …

Read More »

खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी संपुष्टात

  लवकरच नविन पदाधिकारी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी येत्या काही दिवसांत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे खानापूर शहरातील नगरसेवकातुन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षासाठी कोणते आरक्षण येणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. येत्या दोन वर्षे सहा महिन्यासाठी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाचा कालावधी राहणार आहे. मागील दोन वर्षे …

Read More »

नवनिर्वाचित आमदार हलगेकरांनी घेतली कन्नड भाषेत शपथ; मराठी भाषिकांत नाराजी

  खानापूर : खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शपथविधी संपूर्ण तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मराठी भाषिकांची मोठ्या प्रमाणात मते मिळवून विजय प्राप्त केलेल्या हलगेकर यांनी विधानसभेत मात्र कन्नडमध्ये शपथ घेत मराठी भाषिकांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शपथविधीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत …

Read More »

भाजपच्या काळात अर्धवट पडलेल्या इंदिरा कॅन्टीनला अच्छे दिन येतील?

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यात सिध्दरामय्या मुख्यमंत्री असताना इंदिरा कॅन्टीनला सुरूवात झाली होती. त्यामुळे सामान्य जनतेला नाष्टा, जेवन अल्पदरात मिळत होते. काही काळात सिध्दरामय्याचे सरकार कोसळले तसे इंदिरा कॅन्टीनचा प्रकल्प रखडला. त्यामुळे खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात इंदिरा कॅन्टीनचा पाया घालण्यात आलेला प्रकल्प रखडला. तो आतापर्यंत तसाच आहे. …

Read More »

खानापूरात २५ मे रोजी चित्ररथ मिरवणूक!

  खानापूर : शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक दि. 25 मे रोजी खानापुरात काढण्यात येणार असल्याची माहिती खानापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली दिली. यावर्षी शिवजयंती दिवशी निवडणूक आचार संहिता असल्याने शिवजयंती एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुका झाल्याने …

Read More »

हब्बनहट्टी येथे शेतकरी महिलेवर अस्वलांचा हल्ला, महिला गंभीर जखमी

हब्बनहट्टी : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी गावातील एका महिलेवर दोन अस्वलानी हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली आहे.हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती. नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन …

Read More »