खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे.
खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत अंगणवाडी शाळांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी एका आदेशान्वये सुट्टी जाहीर केली आहे. खानापूर तालुका व बेळगाव ग्रामीणमधील अंगणवाडी शाळांना मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 10 ऑगस्टपर्यंत सतत 5 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कित्तूर तालुक्यातील अंगणवाडी शाळांना मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.