Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी

Spread the love

 

खानापूर : सर्व सरकारी शाळा वाचविणे अभियानच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठी, कन्नड तसेच उर्दु सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी बोलावण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या पटसंख्येत होणारी घट तसेच अतिथी शिक्षक नियुक्ती तसेच विविध अडचणीवर होणार चर्चा असून या बैठकीत सर्व शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष तसेच शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात तसेच शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड खेळाची, योग, कला, क्रीडा, विविध स्पर्धा संस्कृती जपण्यासाठी गावोगावच्या मातृभाषा जपल्या पाहिजेत. टिकवल्या पाहिजेत आणि आपली मुलं मातृभाषेत शिकली पाहिजेत यासाठी सर्व सरकारी शाळा वाचवण्याबाबत अभियान रविवार दिनांक 04 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 11.00 मिनिटांनी आय. बी. कार्यलय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे आवाहन विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर, खानापूर तालुक्यातील सर्व शाळा एसडीएमसी कमिटी अध्यक्ष व सदस्य शिक्षण प्रेमी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *