Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या लढ्याला यश…

  खानापूर : रंजिता प्रियदर्शनी व स्रीरोग्य तज्ञ असलेल्या खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करून दरमहा एक दिवस पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी वेळोवेळी सरकारकडे केली होती, पुढे जाऊन ही मागणी अनेक महिलांनी उचलून धरली. दरम्यान सिद्धरामय्या …

Read More »

घराची भिंत कोसळून मजूर ठार; खानापूर तालुक्यातील रामापुर येथील दुर्दैवी घटना

  कक्केरी : खानापूर तालुक्यातील रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक मजूर मरण पावला. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत …

Read More »

सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध

  खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे …

Read More »

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आमदार साहेबांच्या सोबत उभी असेन : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते हब्बनहट्टी येथे वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकू नाईक तर स्वागताध्यक्ष नागोजी पाटील हे होते. जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथे हे एकमेव वाल्मिकी मंदिर उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अंजलीताई …

Read More »

हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची उपस्थिती

  खानापूर : आज वाल्मिकी जयंती. या जयंतीचे औचित्यसाधून हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या आज सकाळी ११.३० वाजता हबनहट्टी येथे उपस्थित रहाणार असून डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याहस्ते मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. निंबाळकर या आमदार असताना या मंदिरासाठी …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी कार्यकर्तीच्या खून प्रकरणी टेम्पो चालकाला अटक

रामनगर : नंदगड (ता. खानापूर) येथील अंगणवाडी कार्यकर्ती अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणात टेम्पो चालक शंकर पाटील (वय 35) याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी शंकर पाटील याने आपल्या टेम्पोमधून अश्विनी पाटील यांना …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो-खो, कबड्डी स्पर्धा 18 व‌ 19 ऑक्टोबर रोजी

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 व दिनांक 19 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो -खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेची आत्महत्या की हत्या?

खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनेघाट-पालडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यात तरंगताना एका महिलेचा मृतदेह शनिवारी (रात्री) सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) अशी पटली आहे. त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पाटील या …

Read More »

गवी रेड्याच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गणेबैल काटगाळी रस्त्यावरील जंगल भागात गवी रेड्याने बैलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बैलाचा जबडा पूर्णपणे तुटला असून त्याला चारापाणी खाणेदेखील अशक्य झाले आहे. हा बैल गणेबैल येथील शेतकरी देवाप्पा राघोबा गुरव यांच्या मालकीच्या आहे. वन खात्याला या घटनेची माहिती …

Read More »

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे “व्होट चोर गद्दी छोड” अभियानाला सुरुवात; तालुक्यात राबविली सह्यांची मोहीम!

  खानापूर : एकीकडे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे तर निवडणूक आयोग संविधानाप्रमाणे काम करत नसून व्होट चोरांना मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासहित केला असून देशातील निवडणूक आयोग भाजपाचा बटीक असल्यासारखे वागत असल्याचा आरोप देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय …

Read More »