Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी

निपाणी तालुक्यासाठी स्वतंत्र 10 हजार लसीची शिफारस

मंत्री शशिकला जोल्ले : दहावी परीक्षेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण निपाणी : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य खाते पोलीस प्रशासन अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनी बनवली विज्ञान मॉडेल!

भंगार साहित्याचा वापर : लॉकडाऊन काळाचा सदुपयोगनिपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शाळाही बंद राहिल्या. या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले. मात्र निपाणी शहरातील आंदोलननगर, शाहूनगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने भंगार साहित्यातून अनेक प्रकारची विज्ञान मॉडेल बनवले आहेत. आश्रय नगरमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही किमया …

Read More »

शिक्षकांची कोविड ड्युटी रद्द करावी

माध्यमिक शाळा नोकर संघटना : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सूर्यवंशी) : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असताना देशात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळल्यामुळे सतर्क झालेल्या कर्नाटक सरकारने आंतरराज्य सीमेवर निर्बंध कडक केले आहेत. हे करताना पुन्हा एकदा शिक्षकांना कोविड …

Read More »

बोरगाव कृषी पत्तीन संघाने जपले शेतकर्‍यांचे हित

चेअरमन उत्तम पाटील : संघातर्फे ट्रॅक्टर वितरण निपाणी : बोरगाव प्राथमिक कृषी संघाकडून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याबरोबरच शेती कर्ज, पाईपलाईन कर्ज, ट्रॅक्टर खरेदी कर्ज यासह गरजवंतांना सवलतीच्या दरात कर्ज वितरण करून शेतकर्‍यांचे हित जोपासण्याचे कार्य करण्यात आल्याचे मत संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »

आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गावर अन्याय

माजी आमदार काकासाहेब पाटील : पत्रकार परिषदेत माहिती निपाणी : राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये तालुका पंचायतीच्या 16 पैकी 8 जागांवर खुल्या प्रवर्गाला संधी दिली आहे. परंतु जिल्हा पंचायतीच्या 6 जागेपैकी केवळ एकाच बेनाडी या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे. राज्यात भाजपचे …

Read More »

हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले

अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …

Read More »

मळ्यात 8 फुट मगर आढळली

निपाणी : बेडकिहाळ येथील गळतगा रस्त्याच्या पूर्व भागातील बेल्ले मळ्यात गुरुवारी सकाळी सुमारे 7 ते 8 फुट मगर आढळून आली. परिसरात वावरणार्‍या तीन मगरींपैकी एक मगर मळ्यात दिसून आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच बेल्ले मळ्यात मगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी ही मगर नजीकच्या विहिरीत दिसल्याचे …

Read More »

निपाणी येथे घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास

निपाणी : निपाणी येथील रोहिणीनगरात अज्ञात चोरट्याने घर फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. घरमालक विनायक पाटील यांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विनायक पाटील यांचे मूळ गाव गोंदिकुपी असून त्यांचे आई – वडील गोंदिकुपी येथे राहतात. विनायक पत्नी व मुलांसमवेत रोहिणीनगर येथे भाडोत्री बंगल्यामध्ये राहतात.7 जून रोजी रात्री …

Read More »

कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …

Read More »

लसीकरणावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक

आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात …

Read More »