Thursday , September 19 2024
Breaking News

निपाणी

कोगनोळी तपास नाक्याला तहसिलदारांची भेट; अवैध वाहतुकीवर नजर

  कोगनोळी : 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. निवडणुक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कोगनोळी, आप्पाचीवाडी, मांगूर, बोरगाव, कोडणी आदी आंतरराज्य सीमेवर तपास नाके उभारले आहेत. यामध्ये पोलीस खाते, अबकारी खाते, महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासन आदींचा समावेश आहे. तपासणी नाके मतदान होईपर्यंत म्हणजे …

Read More »

अंतिम टप्प्यात ऊसतोडणी रेंगाळली

  हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत कोगनोळी : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच मजुर टंचाई, गावागावातील म्हाई, यात्रांचा हंगाम व वाढलेल्या उन्हाच्या झळा यामुळे ऊसतोडणी कमालीची रेंगाळली आहे. तोडणी लांबल्यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानेही कोंडीत सापडले आहेत. गेल्या काही वर्षात ऊसाखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली …

Read More »

मोबाईलपासून लांब राहून एकाग्रतेने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : प्रा. एम. बी. निर्मळकर

  बेळगाव : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या जगात टिकायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण यश खेचून आणू शकतो, असे विचार ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य एम. बी. निर्मळकर यांनी व्यक्त केले. …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोरगाव चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी

  निपाणी (वार्ता) : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन व पोलीस खात्यातर्फे चेकपोस्ट उभारणी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात पैसे, भेट वस्तू, मद्याची गैर वाहतूक होऊ नये. या वाहतुकीवर नजर असावी. यासाठी या ठिकाणी चेक …

Read More »

लोकअदालतीत ५ जोडपी विवाह बंधनात

  निपाणीत राष्ट्रीय लोकअदालत; अनेक प्रकरणे निकाली निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोडवरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. त्यामध्ये वकिलांनी समुपदेशन करून घटस्फोटीत व घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. वरीष्ठस्तर न्यायाधीश प्रेमा पवार यांनी ५ …

Read More »

बुडा अध्यक्षपदी लक्ष्मण चिंगळे यांची निवड; निपाणीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

  निपाणी : चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची बेळगाव येथील बुडाच्या (बेळगाव नगर विकास प्राधिकरण) अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली. दरम्यान चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान चिंगळे हे उद्या (दि.१६) सकाळी पदाचा पदभार स्वीकारणार …

Read More »

निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निकु पाटील

  शासन नियुक्तपदी तीन सदस्यांच्या निवडीही जाहीर निपाणी (वार्ता) : निपाणी, चिक्कोडी, अथणी, कागवाड, रायबाग कार्यक्षेत्र असलेल्या येथील टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी संयोगीत ऊर्फ निकु पाटील यांची निवड करण्यात आली. शासन नियुक्त सदस्यपदी तीन जणांची नगरविकास खात्याने निवड केल्याची माहिती निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी शुक्रवारी (ता.१५) येथील येथील …

Read More »

गॅरंटी योजनेमुळे काँग्रेसने इतिहास रचला

  पालकमंत्री सतीश जारकिहोळी; निपाणीत मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने गॅरंटीच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच बैठकीत आश्वासनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे महिलासह कुटुंबाचे सबलीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन पालकमंत्री …

Read More »

हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत रथोत्सव; हजारो भाविकांची उपस्थिती

  निपाणी (वार्ता) : विविध वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई- सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून …

Read More »

चारा, पाण्याची सोय न केल्यास रास्तारोको

  रयत संघटनेचा इशारा; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या चारा, पाण्याची १८ मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट …

Read More »