Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

एनडीआरएफ अनुदानासाठी कर्नाटकाची सर्वोच्च न्यायालयात दाद

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; पाच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर निर्णय बंगळूर : राज्याला केंद्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) निधी तातडीने देण्याचे केंद्राला निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ते आज देतील, उद्या देतील, आज येतील, उद्या येतील, अशी पाच महिने वाट पाहिली. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

धजदला तीन मतदारसंघ; भाजपची अधिकृत घोषणा

  बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, भाजप आणि धजद यांच्यातील जागा वाटप अखेर निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील २८ मतदारसंघांपैकी हसन, मंड्या आणि कोलार लोकसभा मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाला (धजद) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अनिश्चिततेचा तिढा आता सुटला आहे. यासंदर्भात कर्नाटक भाजपचे …

Read More »

खानापूर तालुक्यातील बेकवाड गावात हत्तीचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड भागातील बेकवाड गावात हत्तीचे आगमन झाले असून बेकवाड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोल्लीहळ्ळी आणि नंदगड वन खात्याचे अधिकारी बेकवाड येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर हत्ती गंदिगवाड व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान करून काल रात्री बेकवाड गावात त्यांचे आगमन झाले असल्याचे …

Read More »

पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

  कोगनोळी : येथील माळी गल्लीतील रहिवाशी उदय नसगोंडा उर्फ कल्लाप्पा चौगुले (वय 52) यांचे स्वतःचे विहिरीमध्ये शेतात काम करत असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 22 रोजी दुपारी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर चौगुले मळा म्हणून परिचित असणाऱ्या शेतीवाडीतील त्यांच्या स्वतःच्या विहिरी …

Read More »

संघटितपणे लढल्यास उत्तर कन्नडसह बेळगावच्या दोन्ही जागा जिंकू : सिद्धरामय्या

  बंगळुरू : आम्ही केलेल्या सर्व सर्वेक्षणांमध्ये बेळगावमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास उत्तर कन्नड जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यांसह तिन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकता येतील, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. बंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांच्या कावेरी या शासकीय निवासस्थानी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेण्यात आली. …

Read More »

ममदापूरात रंगला माऊली अश्वाचा रिंगण सोहळा

  ममदापुरात हरिनाम सप्ताहाची सांगता निपाणी (वार्ता) : ‘माऊली माऊली’चा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ममदापूर (के.एल.) येथे आयोजित हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. हरिनाम सप्ताहात आठवडाभर प्रवचन कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम पार पडले. शितोळे सरकार अंकलीकर यांच्या अश्वाचे बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. …

Read More »

निपाणी येथील रोहिणी नगरात डुकरांची दहशत

  लहान मुलांवर हल्ले वाढले : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील रोहिणी नगरात दिवसेंदिवस डुकरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांची दहशत पसरली असून लहान मुलांच्यावर आल्याच्या घटना वाढ होत आहे. याबाबत नगरसेविका उपासना गारवे आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना डुकरांचा बंदोबस्त …

Read More »

खानापूरमध्ये गांजा विक्रेत्याला अटक; 65 हजार किमतीचा गांजा जप्त

  खानापूर : खानापूर शहरातील पारिशवाड क्रॉसवर गांजा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 65 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. खानापूर शहराच्या पारिशवाड क्रॉसवर जाणारा महामार्ग ओलांडून बायपास जवळ एक व्यक्ती अवैध अमली पदार्थ गांजा विकत असल्याची माहिती खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांना मिळाली. त्यानुसार सापळा …

Read More »

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत दोघांना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे मनुष्य जातीला कलंक लावणारी घटना घडली असून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विष्णू कडोलकर (वय 38) व शीरील गुस्थीन लॉडरीग्स (42) या‌ दोघा नराधमांना अटक करण्यात आली असून खानापूर पोलीस स्थानकात त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी …

Read More »

खानापूर समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक 26 मार्च रोजी

  खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित …

Read More »