खानापूर : तिओली देसाईवाडा तालुका खानापूर येथील श्री गणेश मंदिराचा सोळावा वर्धापन दिन 8 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला. यावेळी सौ. व श्री. नंदकुमार गोविंद देसाई व सौ. व श्री. यशवंत दत्तू देसाई यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यानिमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त …
Read More »खानापूरात वनहक्कांच्या मागणीदारांसाठी मार्गदर्शनपर बैठक संपन्न
खानापूर : अतिक्रमित वन जमिनीवर अधिकार मिळवण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क समितीने चालवलेल्या उपक्रमांतगर्त वनहक्क प्राप्तीसाठी जे दावे दाखल करावे लागतात त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया कांही प्रमाणात पूर्ण होऊन बहुतांश मागणीदारांनी ‘क’ नमुन्यातील आवश्यक तो अर्ज भरून तयार केला आहे. तेव्हा दावा मंजूरीसाठी पुढे …
Read More »सदलग्यात मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी
सदलगा : येथील द्रविड शेरी भागातील दूधगंगेच्या पात्रात दत्तवाडकडील बाजूला बोरगांवचे सुमारे सहा मच्छीमार करणारे तरुण मासेमारी करत होते. दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीने धरुन ओढले. रेहमान बहुरुपी (वय ४० वर्षे) असे त्या मच्छीमाराचे नांव असून त्याच्या गुडघ्याच्या खलील भागात पिंडरीच्या …
Read More »एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त ३ दिवसांचा दुखवटा; उद्या सरकारी सुट्टी जाहीर
बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त राज्यात ३ दिवसांचा दुखवटा व्यक्त करून उद्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा शोक कालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर …
Read More »कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून एस. …
Read More »निपाणी सीमेवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखले!
निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. विनापरवाना सुरु होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांना निपाणी सीमेवरच पोलिसांनी रोखले.यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि …
Read More »बसचा पत्रा तुटून पडल्याने महिला प्रवासी जखमी
खानापूर : खानापूर येथे झालेल्या धक्कादायक अपघाताने केएसआरटीसी बस देखभाल आणि व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. बसचा पत्रा तुटून पडल्याने दोन महिला सुदैवाने बचावल्या. निडगल येथील पद्मिनी भुजंग कदम (६५) या गोदगेरीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. रुमेवाडीजवळ गाडीने भरधाव वेग घेतल्याने महिलेच्या पायाखालचे प्लायवूड निखलेले …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने शहरात जनजागृती!
खानापूर : बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सीमाभागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे …
Read More »माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थितीत हायटेक बस स्थानकातील नूतन “श्री गणेश हॉटेल(कॅन्टीन)चा उद्या शुभारंभ!
खानापूर : खानापूर शहरातील नूतन हायटेक बस स्थानकातील इमारतीत उभारण्यात आलेल्या श्री गणेश हॉटेल कॅन्टींगचा शुभारंभ उद्या सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर कॅन्टींगचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस पार्टीच्या सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर श्री …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी
राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta