Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निपाणीत हळदी -कुंकू कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित येथील विठ्ठलराव सावंत नगरातील सखी महिला मंडळातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम पार पडला. येथील समाधी मठातील प्राणालिंग स्वामी यांचे हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन, राजकुमार सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रणव सावंत यांनी स्वागत केले. यावेळी प्राणलिंग स्वामींनी …

Read More »

कर्नाटकातून आयोध्येला ‘आस्था’ विशेष एक्स्प्रेस रेल्वे; बेळगावातून १७ फेब्रुवारीला निघणार

  बंगळूर : कर्नाटकातील हजारो भाविक अयोध्येला भेट देतील या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने कर्नाटक आणि गोवा अयोध्या धामशी जोडण्यासाठी ‘आस्था’ स्पेशल एक्स्प्रेस विशेष गाड्यांना परवानगी दिली आहे. अयोध्येतील नवीन राममंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली असून, मंगळवारपासून जनतेलाही रामाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच विविध राज्यांमधून अयोध्येकडे …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेमध्ये श्रीराम प्रतिमा पुजन कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील चिक्कोडी रोडवरील श्री.महात्मा बसवेश्वर क्रेडिट सोहार्द संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये श्रीराम प्रतिमापूजन करण्यात आले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व सिध्देश्वर स्वामीजींची प्रतिमा पूजन संचालकांच्या हस्ते झाले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी म्हणाले, संस्थेमध्ये व सर्व शाखेमध्ये रामराज्याप्रमाणे कार्य व्हावे. ज्यामुळे सर्व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊन त्यांच्या …

Read More »

‘ईव्हीएम’ हटाओसाठी निपाणीत २५ ला मोर्चा

  निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घोटाळा असून येथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नयेत. यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ संविधान बचाओ, लोकतंत्र बचाओ, मोर्चा गुरुवारी (ता.२५) येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात एस. एस. चौगुले यांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, नॅशनल इंनोवेशन फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ९ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हरियाणा येथील डीबीटी, टीएचएसटी आयई आरसीबी कॅम्पस फरिदाबाद येथे १७ ते २० जानेवारी पर्यंत झाला. यामध्ये माध्यमिक विभागात कर्नाटकातून कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान …

Read More »

ढोणेवाडीत तलाव कामाचा प्रारंभ; पहिल्या टप्प्यात १० लाखाचा निधी मंजूर

  निपाणी (वार्ता) : अनेक वर्षापासून रखडलेल्या ढोणेवाडी तलावाला अखेर उर्जित अवस्था मिळाली आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते, ग्राम पंचायत उपाध्यक्षा नंदिनी कांबळे व ग्राम पंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलाव कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी पहिल्या टप्प्यात दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तलावाच्या दुरुस्तीकडे अनेक …

Read More »

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मराठीतून कागदपत्रे मिळावीत

  म. ए. युवा समितीतर्फे निवेदन; प्रत्येक ग्रामपंचायतीला देणार निवेदने निपाणी (वार्ता) : तालुक्यातील ग्रामपंचायतीनी मराठी मातृभाषेतुन सर्व कागदपत्रे द्यावीत, या निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोहीम आखली आहे. अयोध्यापती श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता.२२) त्याची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी आप्पाचीवाडी ग्राम पंचायतीला हे निवेदन सादर करण्यात …

Read More »

निपाणीत विविध ठिकाणी रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

  निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे झालेल्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी हा सोहळा पार पडला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार राजवाड्यात श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विजयराजे निपाणकर …

Read More »

टपरी चालकाच्या मुलाची सैन्य दलात मेडिकल ऑफिसरपदी भरारी

  आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज निपाणी (वार्ता) : परिस्थितीची जाण, आई-वडिलांचे कष्ट, शिक्षणाच्या आवडीतून मिळवलेल्या यश आकाशाला गवसणी घालणारे ठरले आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर बोरगाव येथील टपरी चालकाच्या मुलाने एमबीबीएस पदवी मिळवून सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून निवड झालेल्या करण महाजन याने आई-वडिलांच्या कष्टातून यशाचे तोरण बांधले आहे. …

Read More »

श्री अरिहंत संस्था लवकरच ठेवींची टप्पा पूर्ण करेल

  आमदार भालचंद्र जारकीहोळी; संकनकेरी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यातही त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारित करून शेतकरी, सभासद, व्यापारी, कामगार, दूध उत्पादकांच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासू संस्था …

Read More »