चिक्कोडी : आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच रायबाग तालुक्यात घडली असताना १७ महिन्याच्या बालकासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील मांगनूर येथे आज घडली. गायत्री वाघमोरे (२६) हिने १७ महिन्याच्या कंदम्मा कुशलसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
कौटुंबिक वादाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आई आणि मुलाचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. सदर घटना चिक्कोडी पोलिस स्थानक हद्दीत घडली.