Tuesday , October 15 2024
Breaking News

सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला

Spread the love

 

 

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावाच्या हद्दीत संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाजवळ एका प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह कारमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आला.
चिक्कोडी येथील सुप्रसिद्ध ग्रॅनाईट व्यापारी फैरोज बडगावी (४०, रा. मुल्ला प्लॉट) हे बुधवारी त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून चालकाच्या सीटवर असलेला फैरोज पूर्णपणे जळाला असून सदर घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या कारला राज्य महामार्गावर आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून, बुधवारी दुपारी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन कारची तपासणी केली.
चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता ही आग लागल्याचे आढळून आले, मात्र त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

अंकलीमध्ये राघवेंद्र स्वामी मठात ३५३ वा आराधना उत्सव संपन्न

Spread the love  सदलगा : राघवेंद्र स्वामी आराधना हा १६व्या शतकातील आदरणीय संत आणि मध्वाचार्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *