बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावचे रहिवासी, प्रतिष्ठित नागरीक वकील श्री. रमेश चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात बेळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री. जोतिबा चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
सहकारी मित्र संदीप अष्टेकर, जोतिबा कणबरकर, यल्लाप्पा भोगुलकर यांनी ही प्रवेश केला.
सदर प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दुर्गेश मेस्त्री, अल्ताफ सनदी, सोहेल कित्तूर, महांतेश कोळूचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.