Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : शिवकुमार

  बंगळूर : मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली असली तरी सिद्धरामय्या यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले …

Read More »

चौकशीला घाबरणार नाही, सत्य समोर येईल

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील लढ्याची रूपरेषा बंगळूर : कोणत्याही चौकशीला मी मागेपुढे पाहणार नाही, सत्याचा विजय होईल. भाजप आणि धजदने माझ्याविरुद्ध ‘राजकीय सूड’ घेतला आहे, कारण मी ‘गरीबांचा समर्थक असून सामाजिक न्यायासाठी लढत आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावर दिली. सिद्दरामय्या म्हणाले, “मी चौकशीस …

Read More »

दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  खानापूर : खानापूर येथील दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ताराराणी हायस्कूलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री. अजित सावंत होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक सलीम कित्तूर व संचालक उपस्थित मुख्याध्यापकांच्या …

Read More »

निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेटला ५.९९ लाखाचा नफा

  निपाणी (वार्ता) : येथील निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप इस्टेटची ३७ वी वार्षिक सभा संस्थेच्या आवारात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते. संस्थेचे संचालक सुधाकर थोरात यांनी, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू आहे. यापूर्वी काळात त्यांनी संस्थेच्या शिर्डीच्या प्रश्न सोडवून सहकार्य …

Read More »

शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या रक्कमेसाठी रयत संघटनेचा गदग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  निपाणी (वार्ता) : गदग जिल्ह्यात हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. पण एका कंपनीतील दोघांनी अनेक शेतकऱ्याकडून सात कोटी रुपयांचा हरभरा खरेदी केला होता. पण नऊ महिने होऊनही रक्कम न दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पुढाकाराने संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नापा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली गदग जिल्हाधिकारी …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ; राज्यपालांचा निर्णय उच्च न्यायालयात कायम

  बेंगळुरू : मुडा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय राज्य उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुडा जमीन वाटप घोटाळाप्रकरणी राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने आज आपला निकाल जाहीर केला आणि …

Read More »

मुडा घोटाळा : उच्च न्यायालयाचा आज निकाल

  मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा निर्णय; सर्वांचे उच्च न्यायालयाकडे लक्ष बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून उद्या (ता. २४) उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात, याबाबत तीव्र …

Read More »

रेणुकास्वामी खून प्रकरण : तिघांना जामीन मंजूर; दर्शन, पवित्राच्या अर्जाची सुनावणी लांबणीवर

  बंगळूर : चित्रदुर्गस्थित रेणुका स्वामी खून खटल्यातील ए १ आरोपी पवित्रा गौडा आणि ए २ आरोपी अभिनेता दर्शन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपीना काल जामीन मंजूर करण्यात आला. एसपीपी प्रसन्न कुमार यांनी दर्शन आणि पवित्रा …

Read More »

खानापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा २६ सप्टेंबर रोजी संप

  खानापूर : येत्या २६ सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करून धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुका ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला असून या पार्श्वभूमीवर खानापूरमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. ग्राम प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव येत्या २६ सप्टेंबर रोजी तालुका केंद्रात कामबंद आंदोलन करून राज्यव्यापी आंदोलन हाती …

Read More »

मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात पालक जागृती अभियान संपन्न

  खानापूर : उत्तम शैक्षणिक उद्दिष्ट गाठायचे असेल तर शिक्षक, पालक आणि बालक एका समान रषेत आले पाहिजेत. जेव्हा ते एका समान रेषेत येतात तेव्हाच शैक्षणिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे गृहीत धरून मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पालक जागृती अभियान घेण्यात …

Read More »