मतदानासाठी तयारी पूर्ण बंगळूर : राज्यातील चन्नपट्टण, शिग्गावी आणि संडूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. १३) मतदान होत असून निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व व्यवस्था केली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटच्या क्षणी डावपेच आखले असून मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्व युक्त्या केल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी चुरशीची लढत …
Read More »राज्यातील ११ अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर लोकायुक्त छापे
महत्वाची कागदपत्रे, मालमत्ता, मौल्यवान वस्तू ताब्यात बंगळूर : कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यातील विविध भागात अकरा सरकारी अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. बेळगाव, हावेरी, दावणगेरे, गुलबर्गा, म्हैसूर, रामनगर आणि धारवाडसह अनेक अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणी सकाळी छापे टाकण्यात आले आणि कागदपत्रे, मालमत्ता आणि मौल्यवान …
Read More »सदलग्यात शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील वक्फच्या नोंदी काढण्यासाठी मोर्चा
सदलगा : येथील कांहीं शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या उताऱ्यांवर वक्फच्या नोंदी अचानकपणे कर्नाटक सरकारकडून केल्या गेल्या असल्याचे आढळून आल्यानंतर तात्काळ पीडीत आणि इतर देखील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज उपतहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. वक्फ हटाव – देश बचाव, अचानकपणे केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन उताऱ्यावरील वक्फच्या नोंदी हटवा, वक्फ मंत्री जमीर अहमदचा धिक्कार असो, …
Read More »हलशी ता. खानापूर येथे गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू
खानापूर : बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील हलसी हलशी या ठिकाणी घडली आहे. अल्ताफ मकानदार (वय 35) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे हलवण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात …
Read More »शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हिवाळी अधिवेशनात आंदोलन; बेनाडीत जनजागृती मेळावा
निपाणी (वार्ता) : दरवर्षी अनेक कारखाने दर जाहीर न करता ऊस तोडणी करतात. यंदाही अनेक कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. याउलट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश धुडकावून कारखाने सुरू केले आहेत. याशिवाय पूर परिस्थितीमुळे सोयाबीनसह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. भरपाई मिळालेली नाही, यासह विविध समस्या घेऊन बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन …
Read More »कॅफे बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात; एनआयएच्या आरोपपत्रात माहिती
बंगळूर : ब्रुकफिल्ड, व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानच्या चिंताजनक माहितीचा संदर्भ आहे. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत असून, पाकिस्तानी वंशाचा संशयित आरोपी (ए ६) दहशतवादी फैजल हा सध्या पाकिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे. …
Read More »मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ
खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. …
Read More »संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक २१ पोटनिवडणूकीसाठी आज ४ उमेदवारी अर्ज दाखल
संकेश्वर : येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने तीन इच्छुकांनी एकूण चार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी ए. एच. जमखंडी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेस नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज करण्यात श्रीमती भारती जितेंद्र मर्डी …
Read More »केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर : मंत्री एच. के. पाटील
बेळगाव : राज्यात सर्वत्र काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास विधी व संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शिग्गावी पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यात आला असून, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. भाजप वक्फसह अनेक …
Read More »मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक
रुपाली निलाखे; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांकडून असंख्य आव्हानांना सामोरे जाताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत असून त्याबाबत विद्यार्थी व पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत सुरत येथील प्रसिद्ध मनसोपचार तज्ञ रूपाली निलाखे यांनी व्यक्त केले. रयत …
Read More »