Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

कस्तुरीरंगन अहवाल कर्नाटक सरकारने फेटाळला; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

  खानापूर : पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रांच्या बाबतीत टास्क फोर्सने केवळ रिमोट सेन्सिंग डेटाच्या आधारे संवेदनशील क्षेत्राची ओळख निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. के. कस्तुरीरंगन अहवालावरील केंद्राच्या मसुद्यातील सूचना जशाच्या तशा स्वीकारल्यास स्थानिक जनतेला अपरिमित त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारने कस्तुरीरंगन अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला …

Read More »

केंद्रीय मंत्री सीतारामन व इतरांविरुध्द एफआयआर दाखल

    लोकप्रतिनिधी न्यायालयाचे निर्देश; निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा आरोप बंगळूर : येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर नेत्यांविरुद्ध आता रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्याला निवडणूक बाँड योजनेशी संबंधित फसवणुकीच्या आरोपांची …

Read More »

गणेबैल टोलनाकावाल्यांची पुन्हा अरेरावी

  खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर सामान्य जनतेला अजून त्रास देणे चालूच आहे. आज गणेबैल टोलनाक्यावर एक जणांची गाडी अडविली. सदर व्यक्तीने मासिक पास दाखविला तरी सुद्धा गणेबैल टोलचालकांचा अरेरावीपणा चालूच होता. शेवटी त्या सन्माननीय गृहस्थानी आपली गाडी आहे तिथेच टोलवर सोडून दुसऱ्या गाडीत बसून खानापूर गाठले. सामान्य लोकांना त्रास द्यायचा …

Read More »

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या 15 खेळाडू विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड!

  खानापूर : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील खेळाडू विद्यार्थीनींचा आपला खेळातील दबदबा जिल्हास्तरीय स्पर्धेतही कायम राखत विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय खेळ खेळण्यास पात्रता फेरीत उज्ज्वल यश संपादन करून आपला पक्का इरादा निश्चित केला आहे. बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी सांघिक स्पर्धा …

Read More »

आमदार मुनीरत्न यांच्या निवासस्थानी एसआयटीचा छापा

  बेंगळुरू : बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान, एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे मुनीरत्न यांच्या निवासस्थानी छापा टाकला. एसआयटी एसीपी कविता यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून मुनीरत्नच्या घरासह एकूण 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यांची तपासणी …

Read More »

खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी आणि वड्डेबैल गावच्या शेतकऱ्यांनी घेतला सबसिडीचा लाभ

  खानापूर : शासनातर्फे शेतीला उपयुक्त यंत्रोपकरणांवर व औजारांवर अनुदान दिले जाते. यात पावर टिलर, पावर विडर (मशागत यंत्र), रोटावेटर, पंपसेट, शाफ कटर (कुट्टी यंत्र) इत्यादी येतात. अशी यंत्रे व औजारे महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती स्वस्त दरात मिळावी म्हणून शासन अनुदान मंजूर करत असते. सन 2024 सालच्या हंगामा करता खानापूरच्या …

Read More »

माझा राजीनामा मागण्याची भाजपला नैतिकता आहे का?; मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा सवाल

  बंगळूर : केंद्र सरकारकडून राजभवनाचा गैरवापर केला जात आहे. माझा राजीनामा मागण्यासाठी भाजपकडे कोणती नैतिकता आहे? मी काही चूक केली नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. म्हैसूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंडकल्ली विमानतळावर आगमन झाल्यावर काँग्रेस नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात लोकायुक्तमध्ये एफआयआर दाखल

  बेंगळुरू : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात म्हैसूर लोकायुक्तात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्त एडीजीपी मनीष करबीकर यांच्या सूचनेनुसार म्हैसूर लोकायुक्त एसपी उदेश यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या एफआयआरमध्ये ए 1, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती ए 2, पार्वती यांचा …

Read More »

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी आस्था शाह हिची निवड

  निपाणी (वार्ता) : कोपरगाव (शिर्डी) येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबी एसई साउथ झोन तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये येथील केएलइ सीबीएसई शाळेची विद्यार्थिनी आस्था चिंतन शहा हिने १४ वर्षाच्या आतील विभागात २२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षाच्या आतील …

Read More »

योग्य कामकाजामुळे ठेवींचे उद्दिष्ट शक्य

  उपाध्यक्ष सतीश पाटील; ‘अरिहंत’ मुख्य शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सीमाभागातील सहकार क्षेत्राला उर्जितवस्था देण्यासाठी तीन दशकापासून अरिहंत संस्थेने सहकार क्षेत्रात योगदान दिले आहे. सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात शाखा विस्तारित करून सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. नियोजनबद्ध कामकाजामुळे ठेवींचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले …

Read More »