Monday , May 25 2026
Breaking News

निपाणीतील दर्गाहमध्ये भाविकांची गर्दी रविवारी खारीक उदीचा कार्यक्रम; चव्हाण घराण्यातर्फे गंध, गलेफ अर्पण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निपाणी येथीलसंत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी (ता. ३) संदल बेडीचा उरूस झाला. शनिवारी (ता. ४) भर उरूस असल्याने नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
फकीर व मानकऱ्यांच्या उपस्थितीत दर्गाह तुरबतीला नैवेद्य दाखवून भाविकांनी आपल्या दंडातील चांदीची बेडी दंडवत घालण्यासह देवाला गलेफ अर्पण केला. गंधरात्रीनिमित्त चव्हाण घराण्यातर्फे गंध, गलेफ मानकऱ्यांसह सवाद्य नेऊन तुरवतीस अर्पण केला. चव्हाण वारसांतर्फे मलिदा, ताक, कण्या व गोडा नैवेद्य अर्पण केला. गंधरात्री जिजामाता चौकात आतषबाजी केली. यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार, रणजित देसाई-सरकार, संग्रामसिंह देसाई-सरकार, पृथ्वीराज चव्हाण, राजूबाबा निपाणकर, संजय माने, विवेक मोकाशी, जयराम मिरजकर, प्रभाकर पाटील,शरद माळगे, बाळू पोतदार, बंडा गंथडे, संतोष गंथडे, सनी साळुंखे, आतिष सुतार, सदाशिव डवरी, सचिन पावले, उरूस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, मानकरी उपस्थित होते.
रविवारी (ता. ५) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खारीक उदीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.६) मानाच्या फकीरांची रवानगी व भंडारखाना, बुधवारी (ता. ८) पाकाळणीचा कार्यक्रम होणार आहे. सत बाबा महाराज चव्हाण समाधी, दर्गाहला गोडा नैवेद्य दाखविला जाणार आहे.
उरूस उत्सवासाठी शिवाजी चौक, कामगार चौक, दगाह गल्ली व दर्गाह परिसरात विविध खेळण्यांची दुकाने, मेवा मिठाईची दुकाने थाटली आहेत.
पाळण्यांचीही गर्दी झाली आहे. सुरळीत दर्शनासाठी महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. राजू मुजावर, हमीद मुजावर, सुभान मुजावर, ख्वाजा मुजावर, मोदीन मुजावर, निहालमुजावर, सदाम मुजावर, जाफर मुजावर, शब्बीर मुजावर, सलमान मुजावर, यासीन हवालदार, परशराम विटेकरी, रफीक बुदिहाळे यांच्यासह मानकरी मान्यवरांची उपस्थिती होती.
—————————————————————–
सीसीटीव्हीची नजर
ऊरूसकाळात समाजकंटकावर नजर ठेवण्याकरीता उरूस उत्सव कमिटीसह पोलीस प्रशासनानेही करडी नजर ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामगार चौक, भाट गल्ली, दर्गा गल्ली, तोफखाना गेट, मेस्त्री गल्ली परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *