निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत को. ऑप क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या कुर्ली शाखेच्या वर्धापन दिन कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. यावेळी महालक्ष्मी व सरस्वती पूजा पार पडली. साहिल माळी व सौरभ तुकाराम कांबळे यांची सैन्यदलात निवड झाली आहे. बळगाव मधील राणी चन्नमा युनिव्हर्सिटी येथे राजश्री विठ्ठल …
Read More »राज्य सरकारने सीबीआयच्या खुल्या चौकशीची परवानगी घेतली मागे
आता राज्यात प्रवेशासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील मुडा भूखंड घोटाळा, वाल्मिकी महामंडळ निधीचा गैरवापर अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या राज्य सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेच्या हातातून सुटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या हद्दीत तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिलेली खुली परवानगी राज्य सरकारने …
Read More »मंत्रिमंडळातील सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी
मंत्री, कायदेतज्ञांशी सविस्तर चर्चा; उच्च न्यायालयात आव्हान देणार बंगळूर : मुडा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची योजना आखत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कायदेतज्ज्ञ आणि काही मंत्र्यांशी पुढील कायदेशीर निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. मंत्रिमंडळातील सदस्यांनी मुख्यमंत्र्याच्या पाठिश खंबीर रहाण्याचा निर्धार केला असून, कायदेतज्ञांच्या सल्यानुसार …
Read More »विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक – विद्यार्थी संवाद महत्त्वाचा
डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनांने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या दीपा हन्नूरकर होत्या. त्या बोलताना म्हणाल्या की, …
Read More »प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे पुन्हा सुरू करावीत; शिवस्वराज संघटनेच्यावतीने आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये लवकरच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार असून ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांवर अतिरिक्त भार आहे त्या डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातील, असे आश्वासन खानापूर तालुका आरोग्य अधिकारी महेश कीडसन्नावर यांनी दिले आहे. शिवस्वराज …
Read More »डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
खानापूर : पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि सीआरएस पदवीपूर्व कॉलेज इटगी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सीआरएस पदवीपूर्व महाविद्यालय इटगी यांच्या मैदानावरआयोजित केल्या होत्या या क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड यांनी सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून …
Read More »सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही : शिवकुमार
बंगळूर : मुडा घोटाळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली असली तरी सिद्धरामय्या यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले …
Read More »चौकशीला घाबरणार नाही, सत्य समोर येईल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील लढ्याची रूपरेषा बंगळूर : कोणत्याही चौकशीला मी मागेपुढे पाहणार नाही, सत्याचा विजय होईल. भाजप आणि धजदने माझ्याविरुद्ध ‘राजकीय सूड’ घेतला आहे, कारण मी ‘गरीबांचा समर्थक असून सामाजिक न्यायासाठी लढत आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावर दिली. सिद्दरामय्या म्हणाले, “मी चौकशीस …
Read More »दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
खानापूर : खानापूर येथील दि. खानापूर माध्यमिक तालुका शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ताराराणी हायस्कूलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री. अजित सावंत होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद संस्थेचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक सलीम कित्तूर व संचालक उपस्थित मुख्याध्यापकांच्या …
Read More »निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेटला ५.९९ लाखाचा नफा
निपाणी (वार्ता) : येथील निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप इस्टेटची ३७ वी वार्षिक सभा संस्थेच्या आवारात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते. संस्थेचे संचालक सुधाकर थोरात यांनी, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू आहे. यापूर्वी काळात त्यांनी संस्थेच्या शिर्डीच्या प्रश्न सोडवून सहकार्य …
Read More »