Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर शहर परिसरात महामेळाव्याची जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यशवंत बिर्जे आणि प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अष्टप्रतिनीधी मंडळाने १९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महामेळाव्याची पत्रके खानापूर शहरात वाटण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, डी. एम. भोसले, अरुण पाटील, जयराम देसाई, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, विशाल पाटील, प्रल्हाद मादार, प्रवीण …

Read More »

येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, रयत संघटनेची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच राज्यातील २१ साखर कारखान्यावर सरकारने धाड टाकून चौकशी सुरू केली. त्यात आपल्या जिल्ह्यातील ७ ते ८ साखर कारखान्याचा समावेश आहे. या धाडीत साखर कारखाने वजन काट्यात तफावत असल्याचे दिसून आले. अशा साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान केले. ती नुकसानभरपाई द्यावी. …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

  सौंदलगा : ‌येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. एस. वाडकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. व्ही. यादव यांनी केले. दीप प्रज्वलन करून उद्घाटन भिवशी येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर व विद्यालयाचे माजी विद्यार्थी रविराज मगदूम यांच्या …

Read More »

नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात महामेळाव्याची जनजागृती

  खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर दौऱ्यामध्ये नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण हे होते. यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

विधानसौध घेराओमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

राजू पोवार : मानकापूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्षभर आंदोलन मोर्चे व निवेदने दिले आहेत. पण त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव विधान सौधला रयत संघटनेसह शेतकऱ्यातर्फे घेराव घालण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष  राजू पोवार …

Read More »

मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या : ज्येष्ठ नेते संभाजी देसाई

  लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला …

Read More »

नियंत्रण सुटून गाडीचा चोर्ला घाटात अपघात; एक जण ठार

  खानापूर : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली. सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी) असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने …

Read More »

मंगळूर स्फोट प्रकरणावरून भाजप-कॉंग्रेसमध्ये द्वंद्व; दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप

  बंगळूर : कुकरचा स्फोट हा मतदार डाटा चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना लोक मूर्ख वाटतात. ते निवडणुकीच्या फायद्यासाठी लोकांच्या भावना भडकवत आहेत, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. त्यावरून भाजप व कॉंग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून कॉंग्रेस-भाजपने एकमेकावर चिखलफेक केली आहे. १९ नोव्हेंबर …

Read More »

दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने खानापूर नगरपंचायतीचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, अर्बन बॅंकेचे चेअरमन अमृत शेलार, …

Read More »

खानापूर नगरपंचायतीकडून टॅक्स न भरलेल्या दुकान व हाॅटेल चालकाना नोटीस

  चीफ ऑफिससरानी केली कारवाई खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची सोमवारी दि. १२ रोजी मासिक बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी खानापूर शहरातील अनेक दुकान व हाॅटेल मालकांनी टॅक्स भरला नाही. अशा दुकान व हाॅटेल मालकाना नोटीसा देऊन देऊन सुचना करा. अन्यथा सील ठोका. नाहीतर नगरपंचायतीच्या उत्पनात …

Read More »