खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर दौऱ्यामध्ये नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण हे होते. यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्याचे पत्रके वाटण्यात आली. सदर महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून माजी आमदार दिगंबरराव पाटील, तसेच नंदगड गावातुन कल्लाप्पा बावकर, राजू लक्केबैलकर, गंगाराम पाटील, नागराज वड्डेबैलकर, किरण पाटील, बाळु पाटील, चंद्रकांत बीडकर, तसेच राजाराम देसाई हलशीवाडी, सुनील पाटील चापगांव, शंकर यळ्ळुरकर हडलगा, शंकर बेळवटकर, विठ्ठल गुरव हलगा, मधूकर पाटील कसबा नंदगड, नारायण कापोलकर सावरगाळी, मर्याप्पा पाटील हारुरी, कृष्णा मण्णोळकर नायकोल, गणेश पाटील, पांडुरंग सावंत गर्लगुंजी, मुरलीधर पाटील जळगा, नारायण पाटील माचीगड इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सीमा सत्याग्रही पुंडलीक मामा चव्हाण यांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी नंदगड भागातून बहुसंख्य मराठीप्रेमी हजर राहतील, अशी ग्वाही दिली. या सभेला बहुसंख्य मराठीप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीवर आपापल्या गावातून सदस्य पाठविण्याची जबाबदारी घेतली.