खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यशवंत बिर्जे आणि प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अष्टप्रतिनीधी मंडळाने १९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महामेळाव्याची पत्रके खानापूर शहरात वाटण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, डी. एम. भोसले, अरुण पाटील, जयराम देसाई, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, विशाल पाटील, प्रल्हाद मादार, प्रवीण पाटील, ईश्वर बोबाटे, लक्ष्मण कसरलेकर, संतोष कदम, नारायण कापोलकर, शिवाजी पाटील, सदानंद पाटील, हणमंत जगताप, उदय भोसले व अनेक मराठीप्रेमी नागरीकांनी रविवारच्या आठवडी बाजारात पत्रके वाटून महामेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले.