Wednesday , May 27 2026
Breaking News

कर्नाटक

बालाजीनगर परिसरातील सुविधांची पाहणी

  बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निपाणी : कोडणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १९० बी, १,२ या ठिकाणी २००१ साली एनए- केजेपी होवून देखील आज अखेर रस्ता, गटार, पथदिप अशा कोणत्याही प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. त्याचबरोबर धारवाड लेआऊटचे नियम बदलून चिकोडी येथे दुसरा लेआऊट तयार करून ९ मिटर रस्त्यापैकी ३ मिटर …

Read More »

शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

  आमदार शशिकला जोल्ले; रयत संपर्क केंद्रातर्फे बियाणे वाटप प्रारंभ निपाणी (वार्ता) : शासनाने शेतकऱ्यांसाठी रयत संपर्क केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. शासन शेतकऱ्यांसाठी सबसिडीवर अनेक योजना राबवत असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले त्यांनी केले. येथील रयत संपर्क केंद्रातून खरीप हंगामातील सोयाबीन …

Read More »

माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी हेमंत निंबाळकर यांची नियुक्ती

  बंगळुरू : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची काँग्रेस सरकारने कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. हेमंत निंबाळकर हे खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे पती होत.

Read More »

बेनाडीतील शेतकऱ्याच्या मुलीला तीन सुवर्णपदके

  केएलईच्या दीक्षांत समारंभात गौरव: निपाणी परिसरातून कौतुक निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी (ता.५) बेळगाव येथील केएलई शताब्दी स्मृती सभागृहात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलागी, केएलई विद्यापीठ आणि केएलई …

Read More »

परिवर्तनासाठी चळवळीची गरज

प्रा. डॉ. अच्युत माने : निपाणीत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडेच सत्ता आहे. यामध्ये सामान्य माणूस कुठे आहे? असा प्रश्न पडला आहे. परिवर्तनवादी चळवळ अस्तित्वात आहे का? हेच समजेनासे झाले आहे. चळवळीसाठी जी नैतिक ताकद लागते ती नैतिक ताकद …

Read More »

मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी शिवप्रेमीतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी इतिहास प्रेमी नागरिक चंद्रकांत तारळे यांच्या हस्ते पूजन झाले. नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या हस्ते शिव पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे …

Read More »

निपाणीतून बोलेरो चोरीस

  निपाणी (वार्ता) : निपाणी-चिकोडी मार्गावर असलेल्या समाधीमठ परिसरातील रहिवासी चेतन संजय घंगाळे यांच्या मालकीचे बोलेरो पिक-अप वाहन अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीसात झाली आहे. सन २०१४ सालचे मॉडेल असलेले सदर वाहन चेतन घंगाळे यांनी शनिवारी (ता.३) रात्री ११ च्या सुमारास आपल्या दारात नेहमीप्रमाणे …

Read More »

निपाणी परिसरात पारंपारिक पद्धतीने बेंदूर

  गांधी चौकात कर तोडणीचा कार्यक्रम : कर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी (ता.५) विविध उपक्रमांनी बेंदूर सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यातील श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या मानाच्या बैल जोडीने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करतोडीचा कार्यक्रम झाला. …

Read More »

बोरगावच्या युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.५) सकाळी उघडकीस आली. शिवाजी बबन निकम (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत इचलकरंजी येथील गावभाग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवाजी निकम हा शनिवारी (ता.३) बोरगाव येथे आपल्या घरी काही कारणामुळे …

Read More »

नव्या सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ जुलैपासून

  बेंगळुरू : काँग्रेस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 7 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे भाषण होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »