Saturday , September 21 2024
Breaking News

कर्नाटक

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून डॉ. अंजलीताई निंबाळकर बाजी मारणार!

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्यातील महिलेला उमेदवारी दिल्यामुळे सर्वत्र नवचैतन्य पसरले आहे. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी महाराष्ट्रातून येऊन खानापूर सारख्या दुर्गम भागात आपल्या समाजसेवेला सुरुवात केली. त्याचीच पोचपावती म्हणून खानापूरवासीयांनी त्यांना एकदा आमदार म्हणून निवडून दिले. पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात भाजपचे सरकार असून देखील …

Read More »

राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान

  २२७ उमेदवारांचे ठरणार राजकीय भवितव्य; २.५९ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क बंगळूर : चुरसीने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या (ता. ७) राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली असून मतदान केंद्रांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व १४ मतदारसंघातील …

Read More »

प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळेल

  जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत …

Read More »

शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा : बाबासाहेब खांबे यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणेच सीमा भागामध्ये निपाणी शिवसेना सीमाप्रश्नाची बांधीलकी जपत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी दिली. खांबे म्हणाले, शिवसेना वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी शिवसेना काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देत आहे. निपाणी सीमाभागामध्ये …

Read More »

आश्रय नगर, शिवाजीनगरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा

  निपाणी (वार्ता) : येथील आश्रय नगर, शिवाजीनगरात चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडल्या. यावेळी म्हैसूरचे आमदार रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शीख समुदायतील ६० हुन अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे …

Read More »

रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

  रेवण्णांना आणखी एक धक्का बंगळूर : प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ प्रकरण एच. डी. रेवण्णा यांच्या कुटुंबासाठी असह्य वेदना बनले आहे. रेवण्णा यांना अटक केल्यानंतर आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. रेवण्णाच्या वकिलाच्या युक्तिवादाला मान्यता मिळाली नाही. पुढील तपासासाठी न्यायाधीशांनी रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे रेवण्णा यांना …

Read More »

प्रज्वल रेवण्णा विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी; गृहमंत्री परमेश्वर यांची माहिती

  बंगळूर : हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात आणखी अडचणीत आले आहेत, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीच्या विनंतीनंतर सीबीआयने प्रज्वलविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली, लैंगिक छळ आणि अपहरणाचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलचा शोध घेण्यासाठी …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल : आबासाहेब दळवी

  खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून …

Read More »

कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली

  कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …

Read More »