जटगे : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. याचबरोबर आपल्या गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर …
Read More »स्तवनधीतील गुरुकुल आश्रमातील सातवी, दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित निपाणी स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल आणि पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. बी. बी. दादन्नावर यांनी स्वागत केले. संचालक महावीर पाटील व चिक्कोडी येथील डाएटचे निवृत्त …
Read More »बोरगाव जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे शनिवारी उद्घाटन
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील शेतकरी व ऊस उत्पादकांना वेळेत पत मिळावे, त्यामधून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२१) होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. मगदूम म्हणाले,जय …
Read More »तणावमुक्त वातावरणात अभ्यास केल्यास यशप्राप्ती
अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये अभ्यास संनियंत्रण समितीची स्थापना निपाणी (वार्ता) : दहावी परीक्षेचा निकाल चांगला लगण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या …
Read More »एआय-आधारित ‘फेशियल अटेंडन्स’ पुढील वर्षापासून राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांत नवी प्रणाली
बंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून एआय-आधारित चेहरापहिचान (फेशियल अटेंडन्स) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विभागाने परिपत्रक जारी केले आहे. मोबाइल ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार असून, ई-शासन पद्धतीने ही योजना राबवली जाईल. याबाबतची घोषणा …
Read More »सिद्धरामय्या हेच राज्यातील जनतेला नेतृत्व निर्णयांबाबत संदेश देतील
शिवकुमार यांचे विधान; नेतृत्वाचा निर्णय योग्य वेळी बंगळूर : नेतृत्वाच्या मुद्द्यावर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे, हे योग्य वेळी जाहीर केले जाईल. हा कोणताही गुप्त व्यवहार नाही. वेळ आल्यावर मुख्यमंत्री स्वतः राज्यातील जनतेला याबाबत संदेश देतील, असे उपमुख्यमंत्री …
Read More »हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकापूरमध्ये मलकारसिद्ध देवाचा पालखी महोत्सव
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात …
Read More »विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या युवकांचा ‘बोरगाव अरिहंत’ परिवारातर्फे सन्मान
निपाणी (वार्ता) : कुन्नूरसारख्या ग्रामीण परिसरातून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुदर्शन आप्पासाहेब मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये मंडल कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या …
Read More »शतकोत्तर वर्षाची परंपरा लाभलेला निपाणीतील महादेवाचा रथोत्सव
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या निपाणी शहराचे दैवत महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथील रथोत्सव महाशिवरात्रीचे खास आकर्षण आहे. यंदा बुधवारी (ता.१८) महादेवाचा ऐतिहासिक रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त… गजेंद्र तारळे, महादेवाचे भक्त, निपाणी निपाणी नगरीची स्थापना श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर सरकार यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीतच …
Read More »कवी संमेलन म्हणजे निव्वळ भावना….
बेंगळुरू : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील राजधानी बेंगळूरू येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अतिशय उत्साहाने साहित्यिक कार्यक्रम करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कवितेची साद घालत कार्यक्रमाची सुरवात कवी संमेलनापासून झाली. कवींना एका सूत्रात बांधायचे कार्य ‘श्वेतुष'(तुषार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta