Monday , September 7 2026
Breaking News

साखरवाडीमधील एस आय आर प्रक्रिया पूर्ण

Spread the love

 

निपाणी‌‌ (वार्ता) : निपाणी तालुक्यामध्ये एस आय आर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनतेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत, यासाठी कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार इन्कम व कास्ट सर्टिफिकेट प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या अनुषंगाने गुरुवारी (ता.६) निपाणी शहरातील साखरवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन इन्कम व कास्ट सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक आणी बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट प्राधिकारचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका सुजाता कराळे, आशा कार्यकर्त्यासह साखरवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

Spread the love  कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *