Monday , August 17 2026
Breaking News

एसआयआरला पुन्हा मुदतवाढ; अर्ज सादरीकरणासाठी १७ ऑगस्टपर्यंत संधी!

Spread the love

 

मतदारांना मोठा दिलासा; दुसऱ्यांदा मुदतवाढीचा निर्णय; मसुदा यादी २४ ऑक्टोबरला, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला

बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयआरअंतर्गत अर्ज स्वीकारणे, अर्ज भरणे आणि भरलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची मुदत आता १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात एसआयआर प्रक्रियेला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी होत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदतवाढ जाहीर केली आहे.

यापूर्वी एसआयआर अर्ज भरणे व सादर करण्याची मुदत २९ जुलैपर्यंत होती. त्यानंतर ती वाढवून ८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती. मात्र, अधिकाधिक पात्र मतदारांना प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी आता पुन्हा मुदतवाढ देत १७ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

मसुदा यादी २४ ऑक्टोबरला

एसआयआर प्रक्रियेअंतर्गत २४ ऑक्टोबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदारांकडून आक्षेप व दावे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्राप्त आक्षेपांवर सुनावणी व निर्णयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अधिक पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अनुप कुमार यांनी एसआयआर अर्जांचे डिजिटलायझेशन करण्याबरोबरच अधिकाधिक पात्र मतदारांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अपर सचिव संदीप कुमार यांनी एसआयआरअंतर्गत अर्ज स्वीकारणे, अर्ज भरणे आणि भरलेले अर्ज पुन्हा सादर करण्याच्या प्रक्रियेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा संधी

मुदतवाढ मिळाल्यामुळे एसआयआर प्रक्रियेत अद्याप सहभागी न झालेल्या पात्र मतदारांना पुन्हा एक संधी मिळाली आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता १७ ऑगस्टपूर्वी एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव मतदार यादीत सुनिश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसआयआरचे सुधारित वेळापत्रक :
१७ ऑगस्ट – अर्ज स्वीकारणे, भरणे व सादर करण्याची अंतिम मुदत
२४ ऑक्टोबर – मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर – दावे व आक्षेप नोंदविण्याचा कालावधी
२४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर – दावे व आक्षेपांवर निर्णयाची प्रक्रिया
२७ ऑक्टोबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *