Monday , September 7 2026
Breaking News

चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश

Spread the love

 

खानापूर : गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून चन्नेवाडी ता.खानापूरच्या रहिवाश्यांना मतदानासाठी भुत्तेवाडी येथील बुथवर मतदानासाठी जावे लागत होते, त्यामुळे मतदारांची गैरसोय होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना निवेदन देऊन चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्डची मागणी केली होती.

त्याच बरोबर चन्नेवाडी गावचे रहिवाशी व खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनीही या मागणीचा पाठपुरावा म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडेही उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले होते. त्यावेळी मोहम्मद रोशन यांनी पुढील महिन्यात स्वतंत्र बूथ करून देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाची पूर्तता करताना जिल्हाधिकाऱ्यांनी चन्नेवाडी गावासाठी 196A हा स्वतंत्र बूथ मंजूर केला असून यापुढील मतदानासाठी गावकऱ्यांना गावच्या प्राथमिक शाळेतच मतदानाची सोय केली आहे. या मागणीच्या पुर्ततेनंतर गावकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खानापूर तालुक्याचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण व तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर कुटुंबीयांच्या न्याय लढ्याला आता कायदेशीर बळ

Spread the love  खानापूर एकीकरण समितीच्या पाठपुराव्याची दखल; वरिष्ठ विधिज्ञ जे. व्ही. नवले यांची नियुक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *