Monday , August 17 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्वगुण विकसित व्हावेत, मतदानाचे महत्त्व समजावे आणि विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ईएलसी क्लब मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक दि.25 जुलै रोजी लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली. निवडणुकीपूर्वी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया, उमेदवारी, प्रचार, मतदारांची जबाबदारी तसेच लोकशाहीतील निवडणुकीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांनी आपले विचार व शाळेच्या विकासासाठीची उद्दिष्टे विद्यार्थ्यांसमोर मांडली. निवडणुकीच्या दिवशी शाळेत प्रत्यक्ष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केले. मतदानानंतर शिक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे सहकारी विद्यार्थ्यांनी उत्साहात अभिनंदन केले.
नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. पंतप्रधान, उपपंतप्रधान, शिक्षणमंत्री, क्रीडामंत्री, सांस्कृतिकमंत्री, स्वच्छतामंत्री, आरोग्यमंत्री, ग्रंथालय मंत्री आदी पदांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदानाचा अधिकार, नेतृत्व, जबाबदारी, निर्णयक्षमता, सहकार्य आणि शिस्त यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी तसेच विद्यार्थीहितासाठी जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प केला.
यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. शालेय स्तरावर लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे त्यांच्यात जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल,” असे मत मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी व्यक्त केले.
मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे झालेली ही शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी ठरली.शाळेचे ईएलसी क्लब प्रमुख इंद्रजीत मोरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षक समन्वयक नीला आपटे, सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *