Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा वाढदिवस साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा वाढदिवस दिवस येथील बरगाव फाट्यावरील के. पी. पाटील सभा गृहात बुधवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला तालुका महिला शिवसेना अध्यक्षा एलन बोर्जिस, नारायण राऊत, …

Read More »

खानापुरातील पोलीस कॉन्स्टेबलची मार्शल आर्ट्समध्ये भरारी

  खानापूर :खानापूर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल प्रकाश गाडीवड्डर यांनी नुकताच हरियाणा येथे झालेला राष्ट्रीय स्तरावरील मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. त्याबद्दल नुकताच पोलिस स्थानकाच्या वतीने तसेच हलकर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गाडीवड्डर हे मूळचे गोकाका तालुक्यातील धुपदाळा येथील आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी कराटे, बॉक्सिंग आणि इतर साहसी …

Read More »

खानापूर निवृत्त शिक्षक संघाचा 30 रोजी वर्धापन दिन

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक निवृत्त शिक्षक संघटनेचा 11वा वर्धापन दिन 30 जुलै 2022 रोजी ज्ञानेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे यावेळी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले यांनी 85 वर्षेपूर्ण झालेल्या संघटनेच्या सभासदांचा सत्कार तसेच राज्यात मराठी माध्यमातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा व 90 …

Read More »

आप्पाचीवाडी येथे हायस्कूल इमारत शुभारंभ

  पालक वर्गातून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या हायस्कूल इमारतीचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. …

Read More »

कर्नाटक भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या

  बेंगलोर : दक्षिण कन्नडमधील सुळ्य तालुक्‍यातील बल्‍लारे येथे मंगळवारी रात्री उशिरा भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्‍यक्‍तींनी प्राणघातक शस्‍त्रांनी वार करून हत्या केली. प्रवीण नेट्टारू हे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना केरळ राज्यातील नोंदणीकृत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तलवारीने यांच्यावर हल्ला केला. हत्येची …

Read More »

आणखी एका संशयित दहशतवाद्याला तमिळनाडूत अटक

सीसीबी पोलिसांची कारवाई, दहशतवादी अख्तरच्या चौकशीतून माहिती समोर बंगळूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहाद युद्ध भडकविण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडूमध्ये आणखी एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी बंगळूरात आणण्यात येत आहे. सीसीबी पोलिसांनी रविवारी रात्री बंगळुरमधील टिळक …

Read More »

सदलग्यातील दूधगंगेवरील जुना पूल ढासळला; किसान पूलही बनत आहे कमकुवत

  सदलगा : सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल दूधगंगेच्या प्रवाहामुळे ढासळला. या पुलाच्या पूर्व-दक्षिण रस्त्याला जोडणाऱ्या बांधकामाच्या दक्षिणेकडील बाजूस भिंतीवरील कोरलेल्या पण पुसट झालेल्या नोंदीनुसार तत्कालीन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एस्. निजलिंगाप्पा यांच्या हस्ते १९५९ सारी या पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल म्हणजे बंधारा वजा पूल पण सदलगा, एक्संबा, …

Read More »

उद्या खानापूर शहरातील महिलांचा रोजगारासाठी मोर्चा

  बेळगाव : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना ज्या प्रकारे ग्राम पंचायतीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो. त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक 27 रोजी खानापूर शहरातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील …

Read More »

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

  सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पैकी १४ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन आणि १९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास पटकावला. यांपैकी प्रथम क्रमांकावर विश्वजीत करंगळे याने ९५.८० टक्के, द्वितीय अपूर्वा कडहट्टीने ९४ टक्के, तृतीय अभिनव काडापुरे याने ९२.८० टक्के तर …

Read More »

संकेश्वरात श्री नामदेव संजीवनी समाधी सोहळा साजरा

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर गांधी चौक विठ्ठल-रखुमाई मंदिरात संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तीला महाभिषेक, संत श्री नामदेव महाराज प्रतिमेला महाभिषेक करुन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सोहळ्यात सोलापूरचे किर्तनकार दिलीप भडंगे महाराजांनी संत श्री नामदेव महाराज संजीवनी …

Read More »