रस्ता कामाची चौकशी करा : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वडर निपाणी (वार्ता) : बोरगाव -बेडकीहाळ, बोरगाव -आयको या आंतरराज्य मार्गांची गेल्या अनेक महिन्यापासून दुरावस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही, अशी …
Read More »पालकांनी मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक
सुधाकर सोनाळकर : दौलतराव पाटील फाउंडेशनतर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : सर्वच मुलांमध्ये कोणते ना कोणते सुप्त गुण असतात. शालेय पातळीवर या गुणांची वाढ होत असताना शिक्षकाकडून त्यांना मार्गदर्शन मिळते. त्यामुळे अनेक मुले विविध खेळासह अभ्यासात पुढे जातात. त्यासाठी आता पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत सुधाकर …
Read More »संकेश्वरात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड…..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवशक्ती जनरल स्टोअर्सने घनकचरा रस्त्यावर फेकून दिल्याने आज पालिकेने दंडात्मक कारवाई केलेली दिसत आहे. शिवशक्ती दुकान मालकाने कचरा रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून येताच आज पालिका सॅनेटरी सुपरवायझर श्रीधर बेळवी, मुकादम सुनिल पाटील, परशराम सत्यनाईक, कृष्णा खातेदार यांनी दुकान मालक वागाराम माळी …
Read More »संकेश्वरात श्री बसवेश्वर यात्रोत्सव….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बसवाण गल्लीतील श्री बसवेश्वर देवस्थानची यात्रा विविध कार्यक्रमांनी, भक्तीमय वातावरणात पार पडली. गेले अकरा दिवस झाले मंदिरात अहोरात्र टाळ वाजवून शिवाची आराधना करण्यात आली. आज निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्रींनी देवाची पूजा करुन आपल्या प्रवचनात बसवेश्वरांची महती …
Read More »नंदगडात भाजपतर्फे महिला मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभामंडपात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नंदगड गावातील माता-भगिनींचा महिला मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेळगाव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यदर्शी सौ. कमलाक्षी होशेट्टी होत्या. कार्यक्रमाला प्रमुखातिथी म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार भाजपा नेते अरविंदराव पाटील, खानापूर तालुका …
Read More »एससी, एसटी आरक्षण वाढीसाठी आदेश जारी करणार
मंत्रिमंडळाचे अनुमोदन; एससी १७ टक्के, एसटी ७ टक्के आरक्षण बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळाने शनिवारी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) साठी आरक्षण वाढविण्याचा कार्यकारी आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर सरकार संविधानाच्या ९ व्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी पावले उचलेल. आरक्षण अनुसूचित जातींसाठी १५ टक्क्यांवरून १७ टक्के आणि …
Read More »कानसीनकोपात व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : कानसीनकोपात (ता. खानापूर) खुल्या व्हॉलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दि. ८ रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवणा गंदिगवाड होते. तर सिध्दरामया स्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, शितल बंबाडी, हणमंत पाटील, बसवराज निंबाळकर, यशवंत कोडोली, …
Read More »गर्लगुंजीच्या तिघांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने सन्मानित
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या तिघांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एन. व्ही. देसाई मुख्याध्यापक मराठी शाळा मच्छे, श्रीमती शकुंतला कुंभार मुख्याध्यापिका मराठी शाळा सुळगे (येळ्ळूर), विलास सावंत मुख्याध्यापक मराठी शाळा चिरमुरे गल्ली खानापूर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड …
Read More »सराफाला लुटणारी टोळी गजाआड
दुचाकी ६.५० लाखाचा मुद्देमाल जप्त : सहा महिन्यानंतर घटनेचा छडा निपाणी (वार्ता) : निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जत्राट- भिवशी मार्गावर ८ मार्च रोजी सराफी दुकान बंद करून जाणाऱ्या धोंडीराम विष्णू कुसाळे (रा.मांगूर) यांचा पाठलाग करून सहा दरोडेखरांनी त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटून उसाच्या शेतात पोबारा केला होता. तब्बल …
Read More »ऊस दर, घर, पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्या : राजू पोवार
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वच सहकारी साखर कारखाने सुरू होतात. यावेळी सर्वच शेतकर्यांना चांगला दर देण्याची घोषणा केली जाते. पण कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसून तुटपूंजा दर दिला जातो. त्यामुळे यावर्षी एफआरपी शिवाय जादा 500 रुपये दर मिळालाच पाहिजे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta