Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

कणकुंबी, तळावडे शाळेत योग दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली विद्यालयात तसेच तळावडे मराठी शाळेत राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष तसेच विश्व भारती क्रीडा संकुलन जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, अनिल देसाई एक्स आर्मी, विश्व भारती क्रीडा संकुलन खानापूर तालुका …

Read More »

वेदगंगा नदी काठावरील केबलची चोरी

सौंदलगा : सौंदलगा येथील गुजर मळा, साळुंखे मळा, वेदगंगा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारीसह इतर आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सुमारे ८०० फूट केबलची चोरी झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गुजर मळ्यातील रयत नामदेव साळुंखे, रविवारी रात्री सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी …

Read More »

योग हा जीवनाचा मार्ग : पंतप्रधान मोदी

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन बंगळूर : योग हा जीवनाचा भाग नसून, ती एक जीवन पद्धती आहे, तो एक जीवनाचा मार्ग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हैसूर येथे व्यक्त केले. ऐतिहासिक भव्य म्हैसूर महाराजा राजवाड्याच्या आवारात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे …

Read More »

योगाने मनशुध्दी साध्य : महादेवी पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : योग-प्राणायमने मनशुध्दी करणे साध्य असल्याचे स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या कार्यदर्शी श्रीमती महादेवी पाटील यांनी सांगितले. संकेश्वर विश्व चेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात शालेय मुला-मुलींनी, शिक्षक-शिक्षिकांनी योग-प्राणायमाचा सराव …

Read More »

नंदगड येथील डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात सम्रता लोहार प्रथम

खानापूर : नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेची सम्रता लोहार हिने 550 (91.66%) प्रथम क्रमांक संपादित केला आहे. वैभवी केसरकर 546 (91%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक संपादित केला आहे. स्वाती मदावळकर हिने 537 (89.50%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला …

Read More »

जिल्हा संपर्क केंद्रातून शेतकऱ्यांना न्याय देणार

राजू पोवार : बेळगावमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : कृषिप्रधान देशात शेतकरी हा मुख्य कणा आहे. तरीही त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारे अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शासनाच्या विरोधात लढल्याने हा अन्याय दूर झाला आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ सुरू आहे. त्याच्याविरोधात रयत संघटना …

Read More »

एसडीव्हीएस शिक्षण संस्थेच्या वतीने जागतिक योगदिन साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ, वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्र आणि ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एस डी हायस्कूलच्या मैदानावर योग-प्रणायमाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, संचालक दयानंद केस्ती, विश्वनाथ तोडकर, कार्यदर्शी जी. एस. …

Read More »

राजा लखमगौडांचं नावलौकिक करणार : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील ५०० एकर जमीनीचा विकास करुन उद्यान काशीने राजा लखमगौडांचं नावलौकिक करणे हेच आपले लक्ष आणि ध्येय असल्याचे हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते हिडकल डॅम येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक योग …

Read More »

खानापूर समितीकडून जांबोटी भागात जनजागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय निघणार्‍या मोर्चा संदर्भात जांबोटी याठिकाणी पत्रके वाटण्यात आली व जांबोटी परिसरातील नागरिकांना या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. निरंजन सरदेसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी …

Read More »

सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठी योग आवश्यक

एस. एस. चौगुले : कुर्ली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन निपाणी (वार्ता) : दररोज योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते, असे मत सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली …

Read More »