खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी बोलाविण्यात आले आहे. पुढील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन उभारणेबाबत, प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणेबाबत, कार्याचे विकेंद्रीकरण व …
Read More »खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी
बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. विकेंडला या भागातील धबधबे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. बेळगावात मुसळधार पाऊस, नद्या, धबधबे ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधबा पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बटावडे …
Read More »सार्वजनिक आस्थापनांवर मराठीत भाषेत फलक लावावेत यासंदर्भात सोमवारी खानापूर समितीची बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक आस्थापनांचे मराठीत नामकरण करून तसे फलक लावावेत यासंदर्भात यापूर्वी परिवहन महामंडळ, खानापूर, बेळगांव, हुबळी कार्यालयांना यासंबंधीत निवेदन दिले आहे. तसेच …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
खानापूर : आज शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी खानापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. खानापूर तालुक्यातील करंबळ, जळगे, जळगेहट्टी, चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ, शीवोली,का, हेब्बाळहट्टी, लालवाडी, कौंदल, झाडनावगे, हेब्बाळ,जे.सी.एच. शाळा नंदगड व संत मेलगे शाळा नंदगड, कसबा नंदगड, भत्तीवडे या …
Read More »अनुसूचित जाती, जमातीचे अनुदान संबंधित वर्षातच खर्च व्हावे : मुख्यमंत्र्यांचा इशारा
अनुसूचित जाती, जमाती राज्य विकास परिषदेची बैठक बंगळूर : एससीएसपी आणि टीएसपी अंतर्गत अनुदान संबंधित वर्षातच खर्च केले जावे. या कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राज्य विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, दरवर्षी वाटप …
Read More »खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध : काँग्रेस नेते महादेव कोळी
खानापूर : खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध आहेत. भारतीय जनता पार्टीसारखे गलिच्छ राजकारण काँग्रेस पक्ष कधीच करत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने असतो, असे काँग्रेस नेते महादेव कोळी म्हणाले. कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना तालुक्याच्या आमदार म्हणून डॉ. अंजलीताई निंबाळकर या विकास कामे राबवीत …
Read More »मुख्यमंत्र्यांनी मुडाचे भूखंड वाटप केले रद्द
सीबीआय चौकशी फेटाळली; मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी म्हैसूर शहर विकास प्रधिकरण (मुडा) द्वारे ४,००० कोटी रुपयांच्या जमीन-वाटप घोटाळ्यातील भाजपच्या घराणेशाही आणि अनियमिततेच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून पर्यायी जागेचे वाटप स्थगित केले. दरम्यान, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस मुख्यमंत्र्यांनी नकार दिला असून राजीनामा देण्याची मागिीही …
Read More »हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा
येडियुरप्पांचे काँग्रेसला आव्हान; भाजप राज्य कार्यकारिणीची विशेष बैठक बंगळूर : मे २०२३ मध्ये राज्यात प्रचंड बहूमतासह सत्तेवर आलेल्या सत्ताधारी काँग्रेसने एका वर्षाच्या अल्प कालावधीत लोकप्रियता गमावली असल्याचा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विधानसभा विसर्जित करून नव्याने जनादेश मागण्याचे आव्हान दिले. “मी तुम्हाला …
Read More »कर्नाटक राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून
बंगळूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून होणार आहे. १५ ते २६ जुलै या कालावधीत नऊ दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन असेल. विधानसभेचे सचिव एम. के. विशालाक्षी यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, राज्यपालांनी १५ जुलैला सकाळी ११ वाजता अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत. २६ जुलैनंतर अधिवेशनाची मुदतवाढ घ्यायची की संपवायचे …
Read More »मातृभाषेतून शिक्षण घेणे काळाची गरज : आबासाहेब दळवी
युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये गुरुवार दि. ४ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या व इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. हरसनवाडी, रामगुरवाडी, बाचोळी, छ. शिवाजी नगर, हलकर्णी, डूक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी, …
Read More »