गुंजी (प्रतिनिधी : संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव स्वच्छता, कर भरणा, ग्रामविकास तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाती जयकुमार गुरव, अध्यक्षा ग्रामपंचायत …
Read More »दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या उपक्रमामुळे समाजाला नवी दिशा
माजी मंत्री वीरकुमार पाटील ; स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरासह कुपनलिकेची खुदाई निपाणी (वार्ता) : येथील दौलत मळा मधील रहिवासी हिमांशू पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रूढी, परंपरेला फाटा देऊन रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि कूपनलिकेची खुदाई करून समाजाला वेगळी दिशा देऊन दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या विचारांमुळे ‘बळवंतरावां’चे जिल्ह्यात समाजकार्य
साहित्यिक योगीराज बागुल ; वराळे फाउंडेशनतर्फे निपाणीत कार्यक्रम निपाणी (वार्ता) : संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निपाणी शहराला बऱ्याचदा भेटी दिल्या आहेत. या काळात त्यांनी बळवंत वराळे यांच्या निवासस्थानी वास्तविक केले आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन वराळे यांनी बेळगाव जिल्ह्यात दलित समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे …
Read More »सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अजितदादा यांना श्रद्धांजली ठरेल; खानापूर समितीच्या वतीने अभिवादन
खानापूर : आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला खानापूर तालुका महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, …
Read More »निपाणीच्या ‘चपाती भाजी’ महागाईचा भडका!
व्यावसायिक सिलिंडर दरात ११२ रुपयांची वाढ ; व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खिशाला कात्री निपाणी (वार्ता) : चपाती भाजीसाठी निपाणीतील हॉटेल प्रसिद्ध आहेत. शहरात कोणत्याही कामासाठी आलेली व्यक्ती चपाती भाजी खाऊनच परतते. दूरवरून आलेले पाहुणेही या चपाती भाजीचा आस्वाद घेऊन जातात. महागाईमुळे चपाती भाजी व इतर हटिलिंग पदार्थ महागले आहेत. डिसेंबर २०२५ …
Read More »स्वयंपाक घरातील फोडणी महागली
खाद्यतेलासह शेंगदाण्याचे भाव कडाडले; महिलांचे बजेट कोलमडले निपाणी (वार्ता) : सहा महिन्यांपासून स्थिर असलेले खाद्यतेल आणि शेंगदाण्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. निपाणीत १० दिवसांपासून सुरू असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे बजेट कोलमडले असून, गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतींत किलोमागे १८ ते २७ …
Read More »हलशीवाडीत २५ एकरांतील ऊस खाक
बेळगाव : खानापूर तालुक्यातील हतशीवाडी येथे शनिवारी उसाला आग लागून २५ एकरांतील ऊस खाक झाला. यावेळी शिवारात ठेवलेले पाईप, स्प्रिंकलर व पंपसेटच्या केबल पूर्णपणे जळाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्स तोडणीची कामे परिसरात सुरू आहेत. मात्र, गावातील वहिले शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील …
Read More »कर्नाटक राज्य मुला-मुलींचे संघ राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीकडे रवाना
निपाणी (वार्ता) : सलग तीन दिवस सराव शिबिर झाल्यावर कर्नाटक राज्य मुला मुलींचा लंगडी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिर्डीकडे रवाना झाला आहे.संदिप मगदूम, प्रथमेश शिंदे, अनिता कोळी , शिवानंद प्रभात आणि प्रविण नरगट्टे यांच्या नेतृत्वाखाली सराव शिबिर झाले. त्याची सांगता होवू हे संघ शिर्डी – महाराष्ट्र कडे रवाना झाले आहेत. …
Read More »ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आणि मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील मुख्य व शहराबाहेरील सर्व रस्त्यांवरील स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नगरपालिकेचे १०९ कर्मचारी आणि १८ वाहनांद्वारे हे काम सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात शहरातील संपूर्ण स्वच्छता होणार असल्याची माहिती …
Read More »चांद शिरदवाड हजरत चाँदपीर दर्गा उरूसनिमित्त उत्तम पाटील यांची भेट
निपाणी (वार्ता) : चाँद शिरदवाड येथील हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चाँदपीर दर्गा उरूसानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दर्ग्यास भेट देत देवदर्शन घेतले.शिवाय तेथीलभाविकांशी संवाद साधला.यावेळी ब्रह्मनाथ पीकेपीएसचे अध्यक्ष रामगोंडा पाटील, अरिहंत बँक संचालक एस. पी. पाटील, जीवनधर फिरगण्णावर, चिंतामणी पाटील, बाळकृष्ण रुपाळे, आप्पासाहेब कोल्हापुरे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta