Sunday , September 20 2026
Breaking News

आमदारांचे नाव सांगून धमक्या, पैशांची मागणी; वैतागलेल्या पंचायत कर्मचाऱ्याची पोलिसांत तक्रार

Spread the love

 

खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत तांत्रिक समन्वयक म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ हट्टीहोळी यांनी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हळगेकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सुनील मड्डीमनी आणि श्रीकांत इटगी हे अनेक दिवसांपासून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत असून, आमदारांचे नाव वापरून पैशांची मागणी करणे तसेच धमकावणे अशा प्रकारचा त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विश्वनाथ हट्टीहोळी यांनी या प्रकाराला कंटाळून खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याबाबत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही स्वतंत्र निवेदन सादर केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, खानापूर तालुक्यात रस्ते, पाणी आणि गटार यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी नागरिक त्रस्त असताना, काही कार्यकर्त्यांकडून पैशांची वसुली होत असल्याची चर्चा जनतेत सुरू असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, पैशांची मागणी नाकारल्यामुळे आमदारांच्या प्रभावाचा वापर करून दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपांची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नसून, पोलीस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *