संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला एच.एल.एल. कंपनीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त पुंडलिक करिगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणगला एच.एल.एल कंपनीत पुंडलिक करिगार हे ३५ वर्षे सिनियर बाॅयलर ऑपरेटर म्हणून सेवा बजावून निवृत झाले आहेत. सेवानिवृतीबद्दल पुंडलिक करिगार यांचा एच.एल.एल. कंपनीचे युनिट प्रमुख के.नरेश, एच.आर.चे विरेंद्र सर यांच्या हस्ते सत्कार करून …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात …
Read More »ग्राहक पीठासाठी वकिलांची खानापुरात निदर्शने
खानापूर : बेळगाव येथे स्थापन करण्यात येणार्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. बेळगावात स्थापन करावयाच्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. खानापुरातही या आंदोलनाचे लोण पसरले. खानापूर वकील …
Read More »निपाणीत केएलई, रोटरीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल आणि निपाणीतील रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थायरॉईड स्क्रीनिंग आणि ब्लड शुगर व एंडोक्राइनोलॉजी या आजारावर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉलमध्ये पार पडले. त्याला रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 110 रूग्णांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी …
Read More »रोपांची लागवड करून साजरी केली वटपोर्णिमा
दौलतराव पाटील फाउंडेशनच्या महिलांचा उपक्रम : परंपरा व पर्यावरणाची घातली सांगड निपाणी (विनायक पाटील) : परंपरा व पर्यावरणाची सांगड घालत येथील दौलत नगरातील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट्स क्लबच्या माध्यमातून वटवृक्षाच्या रोपांची निर्मिती करून महिलांनी वटसावित्री सण साजरा केला. शिवाय वृक्षारोपण करून रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प …
Read More »’गोमटेश’च्या वर्धापन दिनी चित्रकला स्पर्धा उत्साहात
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचा वर्धापन दिन आणि पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील हे होते. प्राची शहा यांनी स्वागत केले. …
Read More »जीएसटी मंत्री परिषदेसाठी बोम्मई दिल्लीला रवाना
बंगळुरू : जीएसटी मंत्री परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्याच्या उद्देशाने आज दिल्लीला जात आहे. कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना भेटणार नाही असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बंगळुरू येथील आरटी नगरातील निवासस्थानी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांची बैठक आज दिल्लीत होत आहे. त्यात सहभागी होऊन संध्याकाळी परत येणार …
Read More »एक विचार, एक ध्येय, एकसंघ राहून समितीची पुढील वाटचाल : गोपाळराव देसाई
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत, सरकारी कार्यालयावर व बसवर फलक मराठीमध्ये लावावेत या मागणीसाठी 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा विराट मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात खानापूर तालुक्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कापोली या ठिकाणी नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ …
Read More »राज्यातील 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीच्या धाडी
बेंगळुरू : बेंगळुरू भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने (एसीबी) शुक्रवारी राज्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी सहाच्या सुमारास राज्यभरातील विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या 80 ठिकाणी 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता आणि धनादेश ताब्यात घेण्यात आले आहेत. एसीबीने बेंगळुरूसह 10 जिल्ह्यात हे …
Read More »प्रदेश कॉंग्रेसतर्फे जोरदार ‘राजभवन चलो’ आंदोलन
नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बंगळूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची राजकीय सूड भावनेतून ईडीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप करून प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे राजभवन चलो आंदोलन हाती घेण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन रोखले. नॅशनल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta