Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक

कोगनोळी (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद बेळगाव जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्भवले. बेळगाव जिल्ह्यात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे सीमेलगत असणार्‍या कोल्हापुरातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला …

Read More »

उत्तर कर्नाटकातील पाणी योजना अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती

बेळगाव (वार्ता) : कृष्णा पाणी योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात अनेक अडचणी आल्या आहेत. या संदर्भात न्यायालयीन वादही सुरू आहे. पुढील महिन्यात दहा तारखेला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सोबतचा वाद आटोक्यात आला आहे. तेलंगणा सरकारने आपली याचिका मागे घेतली आहे. म्हादाईमधून कर्नाटकच्या वाट्याला कमी पाणी मिळाले आहे, याची माहिती केंद्रीय समितीला देण्यात …

Read More »

संकेश्वर बंदला उदंड प्रतिसाद

राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने समाजकंटकांचा धिक्कार संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात आज संकेश्वर समस्त नागरिक व विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या संकेश्वर बंदला सर्व व्यापारी व्यावसायिकांनी, दुकानदारांनी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बेळगांव अनगोळ येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा आणि बेळगांव खानापूर येथील श्री बसवेश्वर …

Read More »

राष्ट्रपुरुषांच्या अवमानप्रकरणी चिक्कोडीत आंदोलन

चिक्कोडी : समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आल्याच्या विरोधात चिक्कोडी येथे कुरबर समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमांचा अवमान आणि विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी तालुका कुरबर संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्‍या दुष्कर्म्यांना अटक …

Read More »

ऊसाचे ट्रॅक्टर रिप्लेक्टरविना!

अपघाताला निमत्रंण : ट्रॉलीला धडकून अनेकांनी गमावले प्राण निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. सर्वच रस्त्यावर रात्री अपरात्री ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करूनही निपाणी भागात बहुसंख्य ट्रॅक्टर हे रिप्लेक्टर शिवाय धावताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना प्राणांना …

Read More »

सर्जा-राजा पुन्हा धावणार!

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा जल्लोष : सीमाभागात उडणार धुरळा निपाणी (विनायक पाटील) : मागील सात वर्षापासून बंदी असलेल्या बैलगाडी शर्यतीला कर्नाटक शासनाने महिन्यापूर्वी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्रात परवानगी नसल्याने त्या भागातील बैलगाडा येणे कठीण झाले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही शर्ती व अटीवर …

Read More »

मुलगा असो वा मुलगी 21 व्याच वर्षी लागणार हळद

सर्वच स्तरावरुन निर्णयाचे स्वागत : मुलींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळणार संधी निपाणी (वार्ता) : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कायद्यात दुरुस्ती होणार असून मुलीचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय लग्न लावणे कायद्याने उल्लंघन होणार आहे. या निर्णयाचे निपाणी तालुक्यातून …

Read More »

बेळगावात सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश फसला : कुमारस्वामी यांची कबुली

बेळगाव (वार्ता) : ज्या कारणासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली, अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला तो उद्देश सफल झालेला नाही अशी कबुली माजी मुख्यमंत्री व जेडीएस अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मंगळवारी बेळगावात आल्यावर कुमारस्वामी यांनी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेडीएस नेते …

Read More »

धर्मांतर बंदी विधेयकावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, आमदारांनी केला सभात्याग

धर्मांतर विरोधी विधेयकावर आज होणार चर्चा बेळगाव (वार्ता) : गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेल्या धर्मांतर बंदी कायदा विधेयक आज मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सत्ताधारी पक्षाने आडमार्गाने सदनात विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विधेयकाला आमचा विरोध आहे असे सांगून संताप व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी …

Read More »

कर्नाटकमध्ये पुन्हा नेतृत्वबदल होणार?

मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण! बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्माई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 28 जुलै रोजी बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता …

Read More »