सुदैवाने जीवितहानी नाही कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कोगनोळी (ता. निपाणी) येथील आरटीओ कार्यालयाजवळ ट्रक पलटी झाला. ही घटना शुक्रवार दि. 17 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक लेलँड ट्रक क्रमांक (टी.एन.13 टी. 2412) हा ट्रक चेन्नईहून मुंबईकडे काचा घेऊन जात …
Read More »कोगनोळी येथील शेतकर्यांनी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांना दिले निवेदन
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी शेकडो एकर जमीन यामध्ये जाणार आहे. या ठिकाणी सहापदरीकरण रस्त्याला येथील शेतकर्यांचा विरोध नसून या ठिकाणी होणार्या अन्य ऑफिस व मॉल आधी गोष्टींना विरोध असल्याचे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी व्यक्त केले. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले …
Read More »खड्ड्यामुळे गर्लगुंजी-नंदिहळ्ळी रस्त्याची दुर्दशा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक …
Read More »खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे पीजीआर सिंधिया यांची भेट
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या सदस्यांनी नुकतीच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांची बेंगळुरू मुक्कामी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेला असून या समाजाला विविध स्तरावर आरक्षण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांनी …
Read More »वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आ. अंजली निंबाळकरांनी उठवला आवाज!
बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या …
Read More »हदनाळ-म्हाकवे परिसरात जोडप्याचा सहा जणांना गंडा
बनावट मोबाईल विक्री करुन फसविले, कारवाईची मागणी कोगनोळी : पती-पत्नी आणि गुंगीचे औषध दिलेले लहान मूल घेऊन आणि सावज हेरुन बनावट मोबाईल विकले जात आहेत. आतापर्यंत हदनाळ, म्हाकवे आणि परिसरात सहा जणांना गंडा घातला आहे. यामध्ये दोन पत्रकारांचाही समावेश आहे. बदनामीसाठी कोणीही पुढे आलेले नाही हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी सतर्क …
Read More »फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून सर्कस कलाकारांना मदतीचा हात!
बेळगाव : लॉकडाऊन आणि कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील निर्बंधांमुळे बिकट परिस्थिती ओढवली असतानाही पारंपारिक सर्कस कलेचा वारसा जोपासणार्या निपाणी येथील सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांसाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे नुकतीच सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. निपाणीतील सुपरस्टार सर्कसमधील कलाकारांच्या उपेक्षित जगण्याची व्यथा स्थानिक वृत्तपत्र माध्यमातून निदर्शनास येताच बेळगाव फेसबुक फ्रेंड्स …
Read More »तीन महिन्यानंतरही 44 टक्के पुस्तके उपलब्ध
पुस्तकाविनाच विद्यार्थ्यांचा अभ्यास : स्थानिक शाळांनाच पुस्तके वाटप निपाणी : कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुमारे दीड वर्षांनी शाळा सुरु झाल्या आहेत. सध्या पाचवी ते दहावीपर्यंतचे नियमित वर्ग सध्या सुरु झाले आहेत. शाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी केवळ 44 टक्के पुस्तक उपलब्ध झाले आहेत. असे असले तरी अद्याप …
Read More »देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे
मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी : निपाणीत अभियंता दिन निपाणी : शिक्षकांमुळे समाजाची प्रगती, पोलिसांमुळे शांतता, सुव्यवस्था राखली जाते. त्यापाठोपाठ रस्ते, घरबांधणी चांगली होण्यासाठी दळणवळण सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी कार्य केले आहेत. त्यांच्यामुळेच जलाशये, पूल अशी महत्त्वाची कामे होत आहेत देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे मत मंडल पोलीस निरीक्षक …
Read More »निपाणीत रात्रीचा प्रवास धोक्याचा!
भटके कुत्रे आवरा : कुत्र्यांच्या झुंडींनी घेतला रस्ते व चौकांचा ताबा निपाणी : गत महिन्यापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा वाढला आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये व वसाहतींमधील कुत्र्यांच्या झुंडीनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे जायबंदी व्हावे लागत आहे. तर रस्त्यावर अचानक वाहनासमोर कुत्रे आल्याने अपघातही झाले आहेत. मोकाट …
Read More »