Sunday , September 20 2026
Breaking News

एल. के. खोत काॅलेजमध्ये सॅनिटरी पॅडची सोय : डॉ. स्मृती हावळ

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ संचलित एल. के. खोत वाणिज्य महाविद्यालयात सुपंथ मंचच्या वतीने सॅनिटरी पॅडची सोय करण्यात आल्याची माहिती डॉ. स्मृती हावळ यांनी दिली. स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुरेखा हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. मंदार हावळ यांनी सुपंथ मंचच्या वतीने एल. के. खोत काॅलेजला सॅनिटरी पॅड डिस्पेन्सरी बहाल केली.

याप्रसंगी डॉ. स्मृती हावळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, संकेश्वर खोत काॅलेजला आता मुलींनी निश्चितपणे यावे. कारण येथे त्यांच्या सॅनिटरी पॅडची सोय करण्यात आली आहे. मुली आणि महिलांनी मासिक पाळीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मासिक पाळीत कापड्याचा उपयोग सोयिस्कर नसल्यामुळे पॅडचा वापर करण्याची गरज आहे. काॅलेज युवतींनी मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती विषयीची माहिती घेणेची गरज आहे. सुपंथ मंचने बनाना फायबर नॅपकिन उपलब्ध करून दिल्यचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. मंदार हावळ, काॅलेजच्या प्राचार्या श्रीमती डॉ. एस.आय. मडीवाळप्पागोळ, डॉ. डी.डी.कुलकर्णी, के.आर.चव्हाण, प्रा.एस.व्ही.संकी, प्रा.एस.बी.कुंभार, प्रा.आर.बी.बडिगेर, प्रा.झेड. डी. मुल्तानी, काॅलेज विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *