Monday , September 21 2026
Breaking News

ग्रामीण आमदारांकडून जखमी गवंडी कामगाराची विचारपूस

Spread the love


बेळगाव : कोळीकोप येथील गवंडी कामगार बाळु फकीरा नाईक हे कामावर असताना स्लॅब घालतेवेळी काँक्रीट मशीनवरून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. यावेळी त्यांचा हात, पाय आणि कंबर मोडल्याने त्यांना उपचाराकरिता विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यावेळी बाळू नाईक यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेची माहिती समजल्यावर ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी बाळु नाईक यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
बाळू नाईक यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या उपचाराकरिता आलेला खर्च मुख्यमंत्री फंडातून मंजूर करून देण्याची ग्वाही यावेळी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी दिली. तसेच त्यांची विचारपूस करून त्यांना तंदुरुस्त राहण्याकरिता फळे देखील दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *