Friday , October 18 2024
Breaking News

कर्नाटक

खानापूर – जांबोटी क्राॅसवर रस्ता झाला सुना सुना

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी …

Read More »

कर्नाटकात ४२ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद

बेंगळुरू : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावला आहे. सोमवारी, ४२ दिवसानंतर राज्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात, नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा दोन पटहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मे महिन्यातच ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारा सकारात्मकता दर आता १३.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोविडची …

Read More »

विठ्ठल देसाई व ए. ए. मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता खानापूर) अरण्यविभागाचे कर्मचारी विठ्ठल देसाई आणि उपवलय अधिकारी ए. ए. मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला.यावेळी अरण्य वलय अधिकारी प्रशांत गौरानी याच्याहस्ते शाल, श्री फळ, भेटवस्तू, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.निवृत्त कर्मचारी विठ्ठल देसाई यांनी ४२ वर्षे सेवा केली आहे.तर उपवलय अधिकारी …

Read More »

राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ निश्चित?

तांत्रिक सल्लागार समितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल बंगळूरू : राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ बहूतेक निश्चित आहे. येत्या 13 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधात तांत्रिक सल्ला समितीने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना आपला अहवाल सादर केला आहे. अहवालामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या सात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतर …

Read More »

लसीकरणानंतर बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला : सुरेशकुमार

बेंगळुरू : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार म्हणाले, मुलांचा भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घ्यावी असा जोरडा अभिप्राय व्यक्त करण्यात …

Read More »

संभाव्य पूर स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी, खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री गोविंद करजोळ यांनी सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणती पावले उचलली जावी …

Read More »

बोरगावच्या अक्षय गुरवची लेफ्टनंटपदी भरारी!

कर्नाटकातून एकमेव निवड : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सूर्यवंशी) : बोरगाव (ता.निपाणी) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांचे सुपुत्र अक्षय अनिल गुरव याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली. शनिवार 29 रोजी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात अक्षय गुरव यांची भारतीय सेनेत लेफ्टनंट …

Read More »

खानापूर नगरपंचायतीत सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीत बेळगांव पदवीधर मतदारसंघाचे आमदार हणमंत निराणी यांच्याकडून खानापूर नगरपंचायत व तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना कोरोना प्रतिबंधक औषध फवारणीसाठी ८०० लिटरचे सोडियम क्लोराइड नगरपंचायतीत नुकताच वाटप केले.यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने याना खानापूर शहरासाठी १०० लिटर सोडियम क्लोराइडचे वाटप करण्यात आले.तसेच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना ७०० …

Read More »

खानापूर – जांबोटी क्राॅसवर खोकी हटाव मोहिम

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असलेल्या खोकीधारकाना नगरपंचायतीकडून खोकी हटवण्यासाठी नोटीसा पाठविली होती. सध्या जत – जांबोटी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करून रविवारीच खोकी हटाव मोहिमेला सुरूवात झाली.जांबोटी क्राॅसवर जवळपास १०० अधिक खोकीधारक आपला व्यवसाय करून …

Read More »

मोदींनी देशाची संस्कृती जगासमोर आणली : मंत्री जगदीश शेट्टर

हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने देशातील जनतेला सुरक्षा पुरविण्याचे काम केले आहे. मोदीजींनी देशाची संस्कृती जगापर्यंत पोचविली आहे.  “मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या सुशासनसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो,” असे मंत्री जगदीश शेट्टर म्हणाले.मंत्री जगदीश शेट्टर यांनी हुबळी शहरातील माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात कोरोना कमी होत …

Read More »