संकेश्वर (महंमद मोमीन) : आजी-माजी मंत्री योग साधनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथील एस.डी हायस्कूल मैदानावर आयोजित योग दिवस कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील सहभागी होऊन तासभर योग साधनेत तल्लीन होऊन गेलेले दिसले. विजयपूर येथे विद्यमान …
Read More »संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिवस कार्यक्रमाची सुरुवात राजेश कणगली, सौ. श्रीदेवी राजेश कणगली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. योगशिक्षक परशुराम कुरबेटी, पुष्पराज …
Read More »२७ रोजीच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी खानापूर समितीच्या वतीने नंदगड, जांबोटी भागात जनजागृती
खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवार दिनांक २२ जून २०२२ रोजी नंदगड बाजारपेठ येथे पंचक्रोशीतील हजारो मराठी भाषिकाना मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. यावेळी सीमासत्यागृही म. ए. समितीचे माजी अध्यक्ष पुंडलीक चव्हाण …
Read More »नंदगड आठवडी बाजारात खानापूर तालुका म. ए. समितीकडून जनजागृती
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी मधून परिपत्रके मिळावीत सरकारी कार्यालय व बस वर बोर्ड मराठीमध्ये असावेत ही मागणी करण्यासाठी मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी निघणाऱ्या महामोर्चाची नंदगड गावामध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. आज बुधवार दिवशी आठवडी बाजार असल्यामुळे नंदगड परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात जमली होती …
Read More »कणकुंबी, तळावडे शाळेत योग दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली विद्यालयात तसेच तळावडे मराठी शाळेत राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष तसेच विश्व भारती क्रीडा संकुलन जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, अनिल देसाई एक्स आर्मी, विश्व भारती क्रीडा संकुलन खानापूर तालुका …
Read More »वेदगंगा नदी काठावरील केबलची चोरी
सौंदलगा : सौंदलगा येथील गुजर मळा, साळुंखे मळा, वेदगंगा नदी काठावरील पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारीसह इतर आठ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सुमारे ८०० फूट केबलची चोरी झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की गुजर मळ्यातील रयत नामदेव साळुंखे, रविवारी रात्री सोयाबीन पिकास पाणी देण्यासाठी …
Read More »योग हा जीवनाचा मार्ग : पंतप्रधान मोदी
आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन बंगळूर : योग हा जीवनाचा भाग नसून, ती एक जीवन पद्धती आहे, तो एक जीवनाचा मार्ग आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हैसूर येथे व्यक्त केले. ऐतिहासिक भव्य म्हैसूर महाराजा राजवाड्याच्या आवारात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे …
Read More »योगाने मनशुध्दी साध्य : महादेवी पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : योग-प्राणायमने मनशुध्दी करणे साध्य असल्याचे स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या कार्यदर्शी श्रीमती महादेवी पाटील यांनी सांगितले. संकेश्वर विश्व चेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात शालेय मुला-मुलींनी, शिक्षक-शिक्षिकांनी योग-प्राणायमाचा सराव …
Read More »नंदगड येथील डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात सम्रता लोहार प्रथम
खानापूर : नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेची सम्रता लोहार हिने 550 (91.66%) प्रथम क्रमांक संपादित केला आहे. वैभवी केसरकर 546 (91%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक संपादित केला आहे. स्वाती मदावळकर हिने 537 (89.50%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला …
Read More »जिल्हा संपर्क केंद्रातून शेतकऱ्यांना न्याय देणार
राजू पोवार : बेळगावमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : कृषिप्रधान देशात शेतकरी हा मुख्य कणा आहे. तरीही त्याच्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारे अन्याय केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शासनाच्या विरोधात लढल्याने हा अन्याय दूर झाला आहे. अजूनही वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ सुरू आहे. त्याच्याविरोधात रयत संघटना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta