बेळगाव : महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कोयना जलाशय परिसरात देखील कमी पाऊस पडल्यामुळे सध्या बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. कोरोना प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती संदर्भात चिकोडी तालुक्यात पाहणी दौरा केल्यानंतर आज बुधवारी सकाळी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ …
Read More »दुर्गम भागात हेल्प फॉर निडीची मदत
खानापूर : बेळगावपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला धनगरवाडा या वाड्यात 22 ते 25 घरे आहेत. कोरोनामुळे या गावातील आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या कोरोना काळातही या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर यांनी धान्याचे वाटप केले होते आणि आताही या ठिकाणी लहान मुलांसाठी बिस्किटे, पोहे, रवा व धान्य …
Read More »महालक्ष्मी कोविड सेंटरवतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी पार पडला.यावेळी स्वागताध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी स्वागत केले. तर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंगेशजी भिंडे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. भारत माता …
Read More »निरंजन देसाई यांच्याकडून खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन देसाई यांनी खानापूर तालुका समितीला 50 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत.मंगळवारी शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरदेसाई यांनी तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळ देसाई यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी खानापूर तालुक्यात युवा समिती व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोना …
Read More »कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …
Read More »बेळगावात लसीकरणाचे राजकारण आणि लोकप्रतिनिधींची मक्तेदारी : शुभम शेळके यांचा आरोप
बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य …
Read More »लसीकरणावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात …
Read More »कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकच
महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, …
Read More »तालुक्यात कोरोना काळात मिरची पिकाचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात खानापूर तालुक्यातील बिडी सर्कलमधील झुंजवाड के जी गावातील सर्वे नंबर १४६ /४ मधील शेतकरी कौशल्या बाळेकुंद्री यांच्या शेतातील मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिरचीची लागवड केल्यापासुन कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकही बंद झाली. त्यात हातातोंडाशी आलेली मिरची पिक काढणे शक्य झाले नाही. लाखो रूपये …
Read More »महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला महांतेश कवटगीमठांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी अचानक खानापूर तालुक्याच्या भेटीवर आलेल्या एमएलसी व मुख्यमंत्री सचेत महांतेश कवटगीमठांनी शांतिनिकेतन स्कूलमध्ये आयोजित केलेल्या व महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती समितीच्यावतीने व श्रीमहालक्ष्मी ग्रुप, राष्ट्रीय संघ, व जनकल्याण ट्रस्ट यांच्यावतीने सुरू केलेल्या महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी कोविड सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी पुष्पगुच्छ …
Read More »