Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित

मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!

रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …

Read More »

कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!

प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत …

Read More »

कोरोना सेंटरमध्ये रंगला भक्तीगीत भजनाचा नाद!

जोल्ले कोविड सेंटरमध्ये उपक्रम : इंद्रजीत देशमुखांची प्रेरणा निपाणी (संजय सुर्यवंशी) : ’माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या उक्तीप्रमाणे कोल्हापूर येथील माजी कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या प्रेरणेतून समाजाला काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या रोगाला हटवण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक आपआपल्यापरिने मदत करीत आहेत. भजनाच्या माध्यमातून कोरोना रुग्णाचे आत्मबल …

Read More »

निपाणी नगरपालिका कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

निपाणी : कोरोनाच्या महामारीतही निपाणी शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या सफाई कामगार व नगरपलिका कर्मचारी हे प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ’आपले पालिका कर्मचारी, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी …

Read More »

गोवा बनावटीची दारू जप्त : चौघे गजाआड

बेळगाव : टाटा हेस्का गाडीतून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे 15 लाख 35 हजार रुपये किंमतीची 9 बॉक्स गोवा बनावटीची दारू आज अबकारी खात्याने जप्त केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. आनंद राजू कोप्पद (रा. गोकाक), चिदानंद अर्जुन बिरडी (रा. वडरट्टी), यमनाप्पा बागेवाडी (रा. तुक्कणट्टी) आणि शानुर मेहबूब …

Read More »

सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई

सावंतवाडी : मान्सूनच्या पावसाची जोरदार सुरुवात झाली असून आंबोली वर्षा पर्यटन पर्यटकांना खुणावत आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्याने आंबोली कृती समितीकडून काही कठोर निर्बंध घालत पर्यटनला बंदी घातली आहे. यामुळे आंबोली धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे म्हणून आंबोली ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी …

Read More »

भाडोत्री कृषी यंंत्रणाचे बिडीत उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता. खानापूर) येथील रयत संपर्क केंद्रात शेतकरी वर्गासाठी भाडोत्री कृषी यंत्रसामुग्रीचे उद्घाटन सोहळा रविवारी दि. १४ रोजी पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ंटी कृषी निर्देशक शिवनगौडा पाटील, उपकृषी निर्देशक एच. डी. कोळेकर, ग्राम पंचायत अध्यक्षा शांता कुंडेकर, उपाध्यक्ष अंबुतली …

Read More »

म. ए. समितीच्या नेत्यांची कोविड सेंटरला भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्तविद्यमाने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले.यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व पीएलडी बॅंकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, बाॅड राईटर शामराव पाटील, महादेव …

Read More »

बांधकाम व्यवसायाला दिलासा द्या; क्रेडाई आणि सीसीईएची मागणी

बेळगाव : कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाले आहेत. सिमेंट व स्टीलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बांधकाम व्यवसायाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याकडे लक्ष देऊन केंद्र सरकारने लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलावीत आणि बांधकाम व्यवसायात दिलासा द्यावा, अशी मागणी क्रेडाई व …

Read More »