Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

निपाणीतील ओढे, नाले प्लॉस्टीकने फुल्ल!

पावसाचे पाणी जाणार कुठे : नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहर परिसरातील ओढे- नाले प्लॉस्टीक, निर्माल्य, जुने कपडे, जुन्या इमारतीची दगड माती अशा टाकावु साहित्याने भरलेली आहेत. पावसाळ्यात पाणी वाहण्यासाठी जागाच नाही. अशावेळी अतिवृष्टीने महापुर आला तर शेती बरोबरच परिसरातील रहिवाशांचेही नुकसान होणार आहे. त्याकडे नगरपालिका …

Read More »

पाच दिवसानंतर उघडली किराणा दुकाने

कोरोना नियमांचे पालन करण्याची भूमिका : मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यकच निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाऊनमध्ये निपाणी तालुक्याचा समावेश केला होता तरीही रुग्णसंख्या वाढतच गेली. अखेर स्थानिक प्रशासनाने निपाणी व परिसरातील किराणा दुकाने  सलग पाच दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर  दुकाने  सकाळी सहा …

Read More »

मलप्रभा नदीघाटजवळील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हिंदू समाजासाठी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करावी. अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांना खानापूर नगरवासीयांच्यावतीने नुकताच देण्यात आले आहे.खानापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नविन एक स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी होत होती. यासाठी नगरपंचायतीकडे निधीही मंजूर आहे परंतु निधी दुसरीकडे …

Read More »

बँकांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचा महापूर

सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी : तीन दिवसानंतर उघडल्या बँका निपाणी : येथील शहरातील बँकेसमोर ग्राहकांची झालेली गर्दी. निपाणी (संजय सूर्यवंशी) : गेल्या महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात रुग्णांनी मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तब्बल पाच दिवसानंतर बँका …

Read More »

श्री महालक्ष्मी कोविड सेंटरकडून बिदरभावीत कोरोना औषधाचे मोफत वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे भितीचे सावट पसरले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपच्या व लैला शुगर फॅक्टरीच्या सौजन्याने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिदरभावी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा. यासाठी कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.यावेळी …

Read More »

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२9 ऑगस्टला

बेंगळुरू : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी …

Read More »

खानापूर- रामनगर रस्त्याचे काम त्वरित करावे

खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना …

Read More »

खानापूर श्री महालक्ष्मी कोविड सेंटरला खा. कडाडी यांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सोमवारी दि. ७ रोजी भेट देऊन पाहणी केली. व त्याबद्दल एक तास चर्चा केली.यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री …

Read More »

खानापूर ता. प. कार्यालयात रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास …

Read More »

कोरोना उपचारांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे.नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत किंवा  ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. कोराना रुग्णांना पूर्वी वाफ घ्यायचा सल्ला देण्यात येत होता. मात्र, आता …

Read More »