Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

विघ्नसंतोषींकडून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न : रविंद्र घोडके

खाटीक समाजाची बैठक निपाणी (वार्ता) : येथील खाटीक समाजाचे हडप केलेले समाजाच्या मालकीचे व गरीबांच्या हक्काचे भूखंड परत मिळविण्यासाठी समाजाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पोटशूळ उठून समाजाची दिशाभूल करण्याचे काम समाजातील काढून विघ्नसंतोषी मंडळींकडून सुरू आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. रविवारी (ता. 19) श्री बिरदेव यात्रा व त्यानंतर …

Read More »

निडसोसी श्रींच्यावर शुभेच्छांचा वर्षाव….

संकेश्वर (महंमद मोमीन) : निगसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस भक्तगणांनी भक्तीपूर्वक साजरा केला. निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठात बहुसंख्य भक्तगणांनी श्रींचा आर्शीवाद घेऊन शुभेच्छा प्रदान केल्या. संकेश्वर वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्रातर्फे परमपूज्य महास्वामीजींना शैक्षणिक साहित्य देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष …

Read More »

कत्ती सावकार धन्यवाद…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील समस्या जाणून घेण्यासाठी नुकताच माजी खासदार रमेश कत्ती यांनी पहाणी दौरा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, गटारीत सांडपाणी तुंबून राहिलेले, गावत सगळीकडे अस्वच्छतेचे रडगाणे ऐकून रमेश कत्ती चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सत्तारुढ नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यात नगरसेवक कमी पडल्याची खंत व्यक्त करुन …

Read More »

संकेश्वरात बाळू मामांच्या नावाने चांगभलं…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मठ गल्लीतील श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ सद्गुरू संत श्री बाळूमामांंच्या बकरींचे आगमन होताच बाळूमामांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. बगा क्रमांक-१८ गडहिंग्लज औरनाळ, भडगांव मार्गे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ दाखल झाले. संकेश्वरातील भक्तगणांनी सद्गुरू बाळूमामा महाप्रसादाचे आयोजन केले होते. भक्तगणांनी बाळूमामांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा …

Read More »

कोगनोळी बेंदूर सण शांततेत साजरा करा : माजी मंत्री वीरकुमार पाटील

कोगनोळी : कोगनोळी येथील बेंदूर सण प्रसिद्ध असून कर्नाटक महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लोक बैलांची कर पाहण्यासाठी येत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बेंदूर सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. चालू वर्षी कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने बेंदूर सण मोठ्याने साजरा करण्यात येणार आहे. गावातील सर्वांनी मिळून बेंदूर सण साजरा करण्याचा …

Read More »

विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी जोपासाव्यात : सौ. रूपाली निलाखे

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा शाखेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक मार्गदर्शन करताना शाखेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रुपाली निलाखे (कासार) यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना विद्यार्थ्यानी आहार कसा घ्यावा, योगा करावा, चांगल्या सवयी जोपासावेत व आपले आपल्या आई-वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले. सौंदलगा …

Read More »

धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असेल तर जेडीएसने आम्हाला पाठिंबा द्यावा : सिद्दरामय्या

बेंगळुरू : भाजपचा प्रभाव करायची इच्छा असेल तर, धर्मनिरपेक्ष तत्वांवर विश्वास असेल तर जेडीएसने राज्यसभा निवडणुकीत आमचे उमेदवार मन्सूर अलिखान यांना पाठिंबा द्यावा, असे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायचे असेल तर कमी जागा असलेल्या काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करून …

Read More »

सरकारकडून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट : ईश्वर खांड्रे

हुबळी : भाजप सरकार पाठ्यपुस्तकात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा इतिहास फिरवून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. याची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. ईश्वर खांड्रे यांनी केली. हुबळी शहरात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. ईश्वर खांड्रे म्हणाले, पाठ्यपुस्तकात सुधारणांच्या नावाखाली भाजप सरकारने धिंगाणा …

Read More »

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा

तांत्रिक सल्लागार समितीची सरकारला शिफारस बंगळूर : कर्नाटक तांत्रिक सल्लागार समितीने मुखवटा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी अनिवार्य मास्क नियम एका आठवड्याच्या आत पुनरुज्जीवित करण्याची शिफारस केली आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यांविरुध्द दंड आकारण्याचा सल्लाही दिला आहे. बंगळुरमध्ये कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तथापि, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कोविडचे नियमन …

Read More »

निडसोसी श्रींचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस संकेश्वरातील सदभक्तगणांनी सरकारी प्राथमिक मुला-मुलींंच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाने उत्साही वातावरणात साजरा केला. येथील सरकारी प्राथमिक कन्नड-मराठी-उर्दू मुला-मुलींच्या तसेच गौतम शाळेतील विद्यार्थ्यांना सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, राजू बोरगांवी, कुमार बस्तवाडी, संदिप …

Read More »