Tuesday , August 25 2026
Breaking News

क्रिडा

भारताचा पाकवर 5 गड्यांनी दणदणीत विजय

  दुबई : आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 5 विकेट्स राखून पाकिस्तानच्या संघाला धुळ चारली. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब …

Read More »

भारत आणि पाकिस्तान आज आमनेसामने

  दुबई : भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, …

Read More »

आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानची विजयी सलामी!

अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय दुबई : शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी दहा षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले. अफगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून …

Read More »

आजपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

  अफगाणिस्तान-श्रीलंका सलामीची लढत दुबई : कमालीच्या अनिश्चिततेनंतरही लोकप्रिय असलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आशियाई देशांमधील रणसंग्रामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. आशियाई वर्चस्वाचे उद्दिष्ट असले, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच उपखंडातील संघ आपली रणनीती निश्चित करेल. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होईल. अफगाणिस्तान-श्रीलंका संघांदरम्यान सलामीची लढत असली, …

Read More »

भारताचा झिम्बाब्वेवर 5 गड्यांनी विजय

  हरारे : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने …

Read More »

भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज विजय; शिखर धवन अन् शुबमन गिलची अर्धशतकं

  हरारे : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हरारे येथील ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमान झिम्बाब्वेचा दहा गडी राखून सहज पराभव केला. सलामीवीर शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांनी १९२ धावांची भागीदारी केली. या …

Read More »

भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व

  मुंबई : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलेय. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी …

Read More »

दिग्गज टेनिसपटू सेरेनाची निवृत्तीची घोषणा

वॉशिंग्टन : टेनिस क्षेत्रावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 23 ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन खेळाडू सेरेना म्हटले की ती खेळापासून “दूर होत आहे”. 40 वर्षीय टेनिस स्टारने सांगितले, की ती काय करत आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे “उत्क्रांती” हाच …

Read More »

आयसीसीचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे अपघाती निधन

  जागतिक क्रिकेटसाठी एक वाईट बातमी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे आज (९ ऑगस्ट) निधन झाले आहे. ७३ वर्षीय रुडी मुळचे दक्षिण आफ्रिकेचे होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका रस्ते अपघातामध्ये रुडी यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात …

Read More »

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित कर्णधार तर राहुल उपकर्णधार

नवी दिल्ली : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. तर यंदाच्या आशिया कपसाठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे …

Read More »