Monday , August 24 2026
Breaking News

एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५ लाख ८९ हजार ३८० रुपये किमतीचे ४१.४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २२ हजार १४६ रुपये किमतीचे ९३.४५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण ६ लाख ११ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४ मार्च २०२५ रोजी कुमारस्वामी लेआउट येथील रहिवासी शाबू दिलीप कांबळे यांनी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २३/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान सदर प्रकरण ‘सी’ रिपोर्टमध्ये बंद करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची परवानगी घेऊन प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आणि चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला.

पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) तसेच मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यू. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने २२ ऑगस्ट २०२६ रोजी नंदिश ऊर्फ बेकी नंद्या उमेश सक्रप्पनवर (वय २९) आणि मंजुनाथ ईरप्पा बंडीवड्डर (वय २८) या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच नंदिश ऊर्फ बेकी नंद्या याने आणखी दोन घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही घटनांशी संबंधित एपीएमसी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ६६/२०२५ आणि ८९/२०२६ यांचाही छडा लागला आहे.

आरोपींकडून एकूण ६ लाख ११ हजार ५२६ रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. के. होळेन्नवर, विठ्ठल हावन्नवर, एएसआय एम. ए. पाटील, पोलीस कर्मचारी बसवराज नरगुंद, खदरशाब खानम्मनवर, रफीक मुजावर, शिवाजी चव्हाण, तपास सहाय्यक प्रशांत रायबागकर, रमेश पाटील तसेच तांत्रिक विभागाचे कर्मचारी रमेश अक्की, महादेव काशीद आणि दीपक दोडगोणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

हातमाग कामगाराच्या आत्महत्येनंतर कुटुंबाला २५ लाखांची मदत आणि कर्जमाफीची मागणी

Spread the love  बेळगाव : हातमाग कारखान्यात काम करणारे विठ्ठल लोकरी यांनी कर्जाच्या बोजामुळे १६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *