
बेळगाव : बेळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वडगाव, जुने बेळगाव, शहापूर आणि अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाउंड, वडगाव येथे होणार आहे.
बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे दरवर्षी शेतजमिनी व पिकांचे नुकसान होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पीक नुकसानीचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देणे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे आणि पुढील कृतीबाबत ठोस निर्णय घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीला संबंधित भागातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या व सूचना मांडाव्यात, असे आवाहन शेतकरी संघटना आणि बेळ्ळारी नाला विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बेळ्ळारी नाल्याच्या पूरप्रश्नावर शेतकऱ्यांची एकजूट आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta