Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले

  उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. या बोगद्यात 36 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. …

Read More »

खूशखबर! सोने-चांदी झालं स्वस्त, दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा

  नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली …

Read More »

राजस्‍थानच्या दौसामध्ये भीषण अपघात; बस पुलावरून कोसळून ४ जण ठार

  दौसा (राजस्‍थान) : राजस्थानमधील दौसा कलेक्टर सर्कलजवळ एका रेल्वे पुलावर बसचे नियंत्रण सुटले आणि ती खाली रेल्वे रुळावर पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर 28 जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला …

Read More »

भूकंपामुळे नेपाळ उध्वस्त, आतापर्यंत 72 जणांनी गमावले प्राण

  नेपाळ : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात …

Read More »

आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी

  आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 50 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी …

Read More »

सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 सदस्यांनी आयुष्य संपवलं, तीन चिमुकल्यांचाही समावेश

  सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संपूर्ण कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी. कुटुंबातील सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळतेय. …

Read More »

फातोर्डात आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार

  मडगाव : एकीकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाकरीता खास येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी फातोर्डा नगरी सज्ज होत असतांना (गुरुवार) रात्री उशीरा फास्टफुडच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पिस्तुलाने गोळीबार करण्याची घटना फातोर्डा परीसरात घडली. व्यवसायिक वादातून तब्बल दोन वेळा मुसिफुल्ला खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. पण सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी …

Read More »

तामिळनाडूत दोन फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट; 11 जणांचा मृत्यू

  विरुधुनगर : तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या फटाक्यांचा कारखान्यांत स्फोट झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मंगळवार या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तामिळनाडूत …

Read More »

देशात पुढील 48 तास पावसाची शक्यता, केरळला ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस

  पुणे : देशासह राज्यातून अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पश्चिम भारतात पुढील 48 तास पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान या राज्यांमधून मान्सून परतला आहे. केरळला …

Read More »

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी …

Read More »