बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके यांना कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत आशा आशायचे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या भेटीत कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी …
Read More »कन्नडसक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे; तालुक म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकारकडून गदा आणली जात आहे. मराठी भाषेला हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. या विरोधात येत्या ११ तारखेला काढण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष, माजी …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘त्या’ वृद्धाची निराधार केंद्रात रवानगी
बेळगाव : कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलेल्या एका असहाय्य वृद्धाची समाजसेविका माधुरी जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. रमेश देशपांडे (वय ७७) असे त्या वृद्धाचे नाव आहे. गेल्या पाच – सहा दिवसांपासून हा वृद्ध बेळगाव शिवाजी कॉलनीत भटकत होता. सदर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते पवन कांबळे, संतोष …
Read More »युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांची घेणार भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उद्या सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्याचे ठरले आहे, तरी बेळगाव येथून खानापूरला रवाना होण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या सकाळी साडेदहा पर्यंत …
Read More »येळ्ळूर शिवारात हायटेक अंधश्रद्धा! उतार्यामध्ये लिंबू-नारळासह चक्क मोबाईल…
बेळगाव : अलीकडे सर्वत्र अंधश्रद्धा फोफावत चालली आहे. पूर्वीपासूनच रस्त्यावर ठराविक दिवशी उतारे पडलेले पाहाव्यास मिळतात. त्यात नारळ, लिंबू, पाणी, सुपारी, केळी, विविध फळ, हळदीकुंकू, गुलाल, दहिभात, बाहुली, कापड, सुई, खिळे, काळा दोरा, कोंबडा, कोंबडीची लहान पिल्ले त्याचबरोबर कोहळा तर कधी कधी बकऱ्यांचा सुद्धा बळी दिला जातो. हल्ली तर …
Read More »शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळल्या प्रकरणी ‘तिघांना’ अटक!
सौंदत्ती : देशभरात जातीयवादावरून राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जातीवादाचा कहर झाल्याचे पहावयास मिळाले. सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने केवळ जाती द्वेष मनात ठेवून त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत गावातील समाजकंटकांनी कीटकनाशक टाकल्याची …
Read More »ग्रामीण शेतकरी व महिलांच्यावतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
बेळगाव : शेतकऱ्यांसाठी लिंकविरहित तात्काळ युरिया पुरवठा व्हावा तसेच शेतामध्ये कामासाठी जाणाऱ्या महिलांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी वडगाव, येळ्ळूर, यरमाळ, धामणे याभागातील ग्रामीण शेतकरी व महिला जिल्हा प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना …
Read More »अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र; 4 आरोपींना अटक
बेळगाव : बेळगाव शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत बेळगाव पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान हेरॉईन व गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अमली …
Read More »न्यू गांधीनगर, अमन नगर येथील उड्डाणपुलाला भीम आर्मी भारत एकता मिशन”चा कडाडून विरोध!
बेळगाव : येथील न्यू गांधीनगर आणि अमन नगर भागातील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाला “भीम आर्मी भारत एकता मिशन”च्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. उड्डाणपूल झाल्यास न्यू गांधीनगर तसेच अमन नगर परिसरातील शेकडो कुटुंबीयांना आपली घरे गमवावी लागतील अशी भीती व्यक्त करत तात्काळ सदर उड्डाणपूल प्रकल्प रद्द करण्याची मागणी …
Read More »आंदोलनात सहभागी असलेल्या वकिलांवरील फौजदारी खटला मागे घेण्याचा मार्ग मोकळा
बेळगाव : 2014 मध्ये बेळगाव येथे कर्नाटक प्रशासकीय न्यायधीकरणाच्या खंडपीठासाठी बेळगाव येथील वकिलानी आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या पैकी 14 वकिलांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर फौजदारी खटले मागे घेण्यास येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंधित वकिलांना दिलासा मिळाला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta