Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; कुडची पूल पाण्याखाली

बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे चिक्कोडी उपविभागातील कृष्णा आणि दुधगंगा नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. सध्या, कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे महाराष्ट्राशी जोडणारा कुडची-उगार पूल पाण्याखाली गेला आहे. लोकांनी पूल ओलांडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. कृष्णा नदीवरील पूल, …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी महामोर्चाला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा जाहीर पाठिंबा

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समिती बैठक सोमवारी दि. 28/07/2025 रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये बेळगांव महानगर पालिकेमध्ये मराठी परिपत्रक मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नगरसेवकानी मराठी बाणा दाखविल्याबद्दल नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, या तिन्ही नगरसेवकांचे …

Read More »

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष जे एम जैनेखान आणि सचिव मडप्पा भजंत्रि यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान …

Read More »

हेरॉईन विक्री करणारे त्रिकूट गजाआड; 48 हजाराचे हेरॉईन जप्त

  बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर सातवा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 48 हजार 400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त …

Read More »

नगरसेवक अपात्रता प्रकरणी “तारीख पे तारीख”; 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी

  बेळगाव : बेळगाव येथील बहुचर्चित खाऊकट्टा प्रकरणासंदर्भात महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आत्ता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल हे या सुनावणीला उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिल्याने …

Read More »

मराठी विद्यानिकेतनने घालून दिला बालवाडी उद्घाटनाचा वेगळा आदर्श

  बेळगाव : समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत शिपाई मामा-मावशी यांच्या हस्ते नूतनीकृत बालवाडी इमारतीचे उद्घाटन करून एक वेगळा आदर्श मराठी विद्यानिकेतन शाळेने निर्माण केला आहे. दिनांक 24 जुलै रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत बालवाडीच्या नूतनीकृत इमारतीचा उद्घाटन‌ समारंभ साजरा झाला. विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. इयत्ता चौथी ते …

Read More »

“बेळगावचा राजा” गणेशोत्सव मंडळाची मुहुर्तमेढ

  बेळगाव : चव्हाट गल्लीतील क्रांती सिंह नाना पाटील चौक येथे सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रविवार दि. २७ जुलै रोजी बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मंडपाच्या खांबाचे पूजन करून मुहुर्तमेढ करण्यात आली. प्रारंभी गल्लीतील सर्व देवतांची विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. तसेच येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता सर्व …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक आज

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक सोमवार दि. 28/07/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सूचनेनुसार ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीसाठी येळ्ळूर विभाग मधून सदस्य निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या …

Read More »

चांगल्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतात : के. आर. भाष्कळ

  बेळगाव : विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत. यासाठी पालकांनी मुलांना योग्य सवयी लावणे आवश्यक असते. आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच, इतर छंद जोपासण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य घ्यावे. योग्य नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावे. आईवडील हेच आधार असतात, असे मौलिक विचार निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी व्यक्त केले. बिजगर्णी हायस्कूल पालक मेळावा …

Read More »

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न

  येळ्ळूर : येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूर-अवचारहट्टी रोड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले. यावेळी नवीन रोपांना खत घालून मशागत करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश समाजात जावा व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता उघाडे यांनी पर्यावरणाचे महत्त्व …

Read More »